29 January 2022

बदलतात लोक...29/1/2022

आपल्या मी ला जपण्यासाठी......
वर्षाचे नाते क्षणात तुटतांना रे पाहिले.....
दोघ बाजूंनी करावा विचार नात्यात.....
अनुभव असे ही गाठी म राहीले......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बदलणं नियम निसर्गाचा.....
असुदे किती जरी....
स्वार्थासाठी बदलणार्यांचा....
घाव लागतो उरी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेळेनुसार तारखाच नाही.....
लोक ही बदलतात किती......
भावनांशी खेळतांना कशी  नसते.....
त्यांना जना मनाची भिती......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेळेनुसार तारखाच नाही.....
लोक ही बदलतात किती......
भावनांशी खेळतांना कशी  नसते.....
त्यांना जना मनाची भिती......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नात्यात आपला वापर केला गेला.....
सल होते बर ही खुप मोठी.....
क्षणात तोडता लोक वर्षाचे नाते......
विश्वासाची सांग ना काय ती कसोटी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खुप त्रास होतो.....
जवळचे दुर जातांना....
पाहिले मी लोकांना.....
वेळेपेक्षा वेगाने रे बदलतांना...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भिती वाटते रे....
कुणाला जवळ करतांना....
वर्पाचे नाते क्षणात....
पाहिले लोकांना तोडतांना...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नाही ना तु बदलणार सख्या.....
वेळ कितीही बदलली तरी....
समजुन घेशील ना मला....
क्षणार्धात नाही ना येणार विरहाची दरी...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सांभाळुन गं वेळेपेक्षा वेगाने....
बदलतात  बर लोक.....
ऋणानुबंध क्षणात। ....
गैरसमजांनी तोडतात लोक.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेळेलाही लाजवतील.....
अशी पटकन बदलतात लोक.....
फायद्या तोट्यावर नात्यांचा खेळ.....
क्षणा क्षणात मांडतात लोक....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्षणात तुटतात.....
गैरसमजांनी नाते.....
जोडण्यासाठी ते आयुष्य.....
निघुन ना रे  जाते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्षणात तोडतात जे.....
वर्षांचे नाते.....
वेळच त्यांना त्याचे....
महत्व पटवुन देते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनाचे आणी भावनांचे....
नसतात जीथे बंध....
क्षणात तुटतात असे.....
बेगडी ते ऋणानुबंध....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही.....✍️✍️


चारोळी संग्रह आणी हायकु.....29/1/2021

बदलतात लोक........
होते की रे जाणले......
त्या लोकांमध्ये तुला......
नव्हते सख्या कधी गणले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कसे ना रूसतात.....
लोक ते आपल्यांवर.....
वर्षाचे नाते तुटतात....
विश्वास म्हणे संपल्यावर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आज कळले  का ग असते.....
आठवणिंची ती ओढ.....
नाते, वेळ बदलता क्षणात.....
प्रामाणिक त्या रहाता किती ना गोड....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वर्षाचे नाते असे.....
क्षणात रे हरले होते.....
राग तर कळला पण.....
प्रेम आहे हे वळलेच नव्हते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नाते क्षणात
जुळतात गोड ना
हो ग ओढ ना!

नाते क्षणात
बदलतात का रे
कळते का रे

नाते क्षणात
तुटतात ते म्हणे
कारण जाणे

नाते क्षणात
विसरता का येते
लक्षात घेते

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कशी शोधू सांग ना तुला.....
दुनियादारीच्या खेळात......
हरवला नाही तु बदललास.....
नाही रे आल ध्यानात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बदलुन गेली म्हणे.....
होते गं त्यांचे म्हणणे...
हो,त्याच्या आवडी नुसार....
सोडले होते गं जगणे...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वर्षाचे नाते क्षणात लोकांना.....
तोडतांना रे पाहिले.....
वाढल्या नको असलेल्या अपेक्षा.....
नी नात्यांना असे मी हरतांना पाहिले.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वर्षाचे नाते क्षणात.....
लोक कसे ना तोडतात....
गैरसमज,दुर्लक्ष,तिरस्कार....
कारणं ही का रे बोचतात...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                         शाही......✍️✍️


28 January 2022

नजारे सुने....28/1/2022

किनार्याला भेटण्यासाठी बघना.....
लाटेचा तो लाखो मैलाचा प्रवास.....
आतुर भेटीचा नजारा ही अपुर्णच.....
आहे ना त्यात आपल्या विरहाचा रे भास.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शशी तो समुद्राशी....
उगाच होता रुसला......
किनार्यावर प्रेम जडले म्हणता....
होता तो हिरमुसला....

नजारा हा प्रेमाचा गोड......
तुझ्याशिवाय अपुर्णच होता.....
आपल्यातल्या रुसव्या फुगव्याच्या.....
कहाण्या तो दाटवत होता.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खुजेपण जेव्हा.....
समुद्र तो जतवुन गेला.....
नजारा हा तुझ्याविन.....
अपुर्णत्व माझे पटवुन गेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तापता वाळु किनार्याची....
निळ्याशार पाण्यात डुंबवणारा....
समुद्राचा हा नजारा अपुर्णच....
पण होता विरह रे तुझा बिंबवणारा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

समुद्र किनारा तटस्थ राहुनही.....
मोहात कसा ना पाडुन जातो.....
तूझ्याविन हा नजाराही.....
जीव रे माझा जाळुन जातो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शशी शिवाय जसा नभ......
आणी पाण्याविन मासा.....
तुझ्याविन तसाच जगण्यात.....
चालतो श्वासांचा तमाशा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तार्यांनी भरलेला आकाश....
हा समुद्र किनारा....
तु नसता सोबत....
विरान हा पसारा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तार्यीनी भरलेले आकाश....
विराण सारा रे भासला.....
तु नसता सोबत....
जणू शशीला ग्रहणच  लागला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अपुर्ण तुझ्याशीवाय....
सारे सुंदर नजारे.....
तु सोबती असता.....
स्वर्ग भासे हे जग सारे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तार्यानि भरलेले आकाश....
हा सागरी कीनार....
देशील ना  साथ....
कराया हा सुंदर नजारा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अपुर्ण आहे तूझ्याशीवाय....
जगण्याचे नजारे....
तु असता सोबतीला....
हसतात सारे तारे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ्या हसण्यात सख्या....
माझ रे नभांगण.....
तुच माझा समुद् आणी....
तुच माझ्या सुखांच दर्पण...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                     शाही.......✍️✍️


हायकु,चारोळी संग्रह। 28/1/2022

प्रेमळ लाट बनुन येईल......
बेधुंद समुद्र होशील का......
चंदेरी वाळुत हरवुन घेईल.....
किनारा असा देशिल का.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आवडेल मला तुझ्या ह्दयांगणात......
प्रेमाची मालकी गाजवायला.....
तुझ्या मनाच्या नभांगणाची.....
राणी होऊन स्वप्न सजवायला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नभांगणातील तो शापीत चंद्र.....
पुर्णत्वासाठी होता त्रासलेला......
हा नजारा विरहाचा भयाण....
मला ही रे ग्रासलेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गर्जणार्या लाटा अबोल झाल्या......
निःस्तब्थ किनार्याला अलगद धडकल्या....
नजारा हा भेटीचा अपुर्ण रे वाटला....
मिठीचा तुझा भास उगाच जागला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नभांगणात  होत गं कौतुक.....
चंद्राच्या गं रुपाचे....
नजारे हे कौतुकाचे ही अपुर्ण....
वाटे भास मला त्यात गं तूझे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अपूर्ण आहे
तुझ्याशिवाय मी रे
सांगावे का रे

अपुर्ण आहे
शशीविन आकाश
ग्रहण पाश

अपुर्ण आहे
लाट-किनारा भेट
ओढ समेट

अपुर्ण आहे
जीवनाचे नजारे
जग तु सारे

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सख्या तुच माझे नभांगण.....
प्रित ह्दयांगणी तुझ्यासवे फुलते.....
तुच माझा  शशी  नी मन.....
तुझ्यावरच रे भुलते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तारकांचा सडा सांडुन......
नभांगण रे ते सजलेले.....
अपुर्ण वाटे सुखद हा नजारा.....
विरहात तुझ्या मन होते ना भिजलेले.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बघ ना!चंद्र आणि चांदण्या......
नभांगणात कशा ना रे खेळतात......
नजारा हा मनमोहणारा वाटे अपुर्णच......
सहवासाचे क्षण आपले उगाच रे छळतात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नजर जाता नभांगणी......
चंद्र तो मोहुन गेला......
नजारा हा अपुर्ण तरिही.......
पहिली नजरभेट आठवुन गेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही.....✍️✍️


27 January 2022

पहिलं प्रेम.... 27/1/2022

दुनियादारी नि कर्तव्यात.....
न भेटता जपतो इभ्रत आधी....
जपणार असं पहिल प्रेम तु माझं....
वाटतं तुला विसरण होईल कधी...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जवळ असता भांडायच....
दुरावताच आठवायचं......
असं खोडकर पहिल प्रेम तु माझं.....
विसरण तुला नाही हं जमायचं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁



कसं विसरेन तुला....
प्रेम तु पहीलं....
त्याग आणी समर्पण.....
तुच तर शिकवलं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁



साधारण होते मी....
खास तु बनवून गेला....
तु ते पहिल प्रेम.....
विसरणं न झाल तुला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

किती गोड ना भावना.....
पहील्या त्या प्रेमाची......
कसं विसराव त्याला.....
जाणिव ज्याने दिली याची.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

न विसरणार असं तुझं......
पहिले प्रेम मी होती का रे.....
अपरीहार्य जगणं तुझ्याविण आता...
तरी तुझ्या उत्तरासाठी मन झुरतं का रे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

देशप्रेमाची भावना आजन्म राहीन....
मिटणार नाही आदर  नी प्रेम.....
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक .शुभेच्छा.....
मताच्या आपल्या जाणा महत्व हिच ईच्छा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

विसराव कसं.....
पहीलं प्रेम तू माझं.....
मीटणार नाही भावना....
श्वासाशीच जुळल नातं तूझं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पहील प्रेम माझं.....
कस तुला विसराव.....
पाण्याविन माश्याने....
कसं बर जगाव.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मिटणार नारी रे कधी.....
भावना झाला तु अशी.....
सांगावा पाठवलाय.....
सांगेल तुला नभातला शशी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खरच का पहील प्रेम....
कुणी नाही विसरत.....
आई बाबांच प्रेम म...
प्रेमात नाही का धरत...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अव्यक्तच राहील.....
पहीलं प्रेम माझ....
विसरणार नाही....
नाव कोरलं मनावर तुझं...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तु भावना रे प्रेमाची....
कशी ना मीटणार......
श्वास आणी स्पंदनाच नात....
सरणावर रे संपणार....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                        शाही.....✍️✍️


आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...