04 March 2022

भेट....

'शीतल "या संध्यासमयी
'दर्शन" तूझे होताक्षणी
'गजल" मज तू वाटली
कधी गगनातील 'शाहीन" तर
कधी 'स्वाती "नक्षत्र भासली
कधी वाटले' रेखा" व्हावे
तूझ्या ग मी हाताची
यावी ग' योगीनी" अपल्या
सुखस्वप्नील जीवनाची
सुखस्वप्नील' वैशाली"त
वाटते आपण रहावे
'प्रिती" चे गीत अपुले
सखलांनी गुणगुणावे
'मनिषा" माझी पुर्ण झाली
'श्वेत "अंबरी' निलीमा" आली
'किर्ती "तूझ्या रूपाची
वेड्या मनी सुखावली

काँलेजला असतांना मैत्रीणींच्या नावांना गुंफून केलेली कवीता....
दर्शन-दर्शना
गजल-गजाला
श्वेत-श्वेता

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                       शाही.....✍️✍️


काँलेजचे दिवस....

सबमिशन पूर्ण करतांना...
एकमेकांना मदतीचा हात.....
प्रश्न उठता जीवनात.....
हवीशी वाटते आजही ती साथ.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काँलेजला शेवटच्या बेंचवर बसून....
खुपदा ग  ते डबे वाटुन खाणे....
बालपणीच्या भातूकलीचे....
होते पून्हा असे आठवून घेणे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गृपस्टडी करायची.....
वेगळीच ना होती गंम्मत....
प्रश्न सहज सुटायचे....
मैत्रीची आठवते ती रंगत...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ययचो ग काँलेजला....
फक्त तूला पाहण्यासाठी....
दुनियादारीची कर्तव्य.....
तेव्हाही  रहायची पाठी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आठवतात काँलेजचे.....
ते गुलाबी क्षण.....
मन तूझ्यात गुंतल्यावर....
अभ्यासात कुठे रमेना मन....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काँलेजने दिला हक्क.....
आवडीचा विषय निवडण्याचा....
जाणीव झाली उशीराने.....
तो गुरुमंत्र होता जगण्याचा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काँलेजच्या दिवसात....
स्वप्न होते गगनाला गवसण्याचे....
पाय नाही सोडले बंधनांनी....
माझे आणी माझ्या मनाचे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काँलेजची ती मैत्री.....
आणी ते प्रेम अव्यक्त.....
किती ना असता खास.....
जाणतो जपणाराच फक्त....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काँलेजच्या जीवनातले....
आठवतात ते मस्त क्षण.....
आत येऊ का सर विचारायचं एकाने....
आत घुसायचे दहा बारा जणं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आठवत ट्रेडिशनल डे ला....
नऊवारी नेसून ते जाणं....
संस्कृती जपल्याच्या....
वेगळाच भाव ते जपणं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही.....✍️✍️


02 March 2022

चारोळी संग्रह। 2/3/2022

परिस्थिती जेव्हा....
परीक्षा तूझी घेईन....
जीद्द बघ सखी होऊन....
संगती रे तूझ्या येईन....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बदलली परिस्थिती.....
तो नाही ग बदलला....
उन सावल्यांच्या खेळात.....
बळ  माझा तोच ग ठरला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

परिस्थिती बघ ना.....
खेळ कसा मांडून गेली....
तूला दिलं कामात गुंतवून.....
विरहात तुझ्या मला रे जाळून गेली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

परिस्थिती काय रे....
परीक्षा क्षणा क्षणा ला घेते....
तू असता सोबती.....
मी ही सर्व हसून नेते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

विषय किती वाढवायचा......
दुर्लक्ष करायच कुठे हे जमत तीला....
परिस्थितीवर मात करणे......
अशक्य नाही म्हणून तीला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नको ग बनू......
कठपूतळी परिस्थितीच्या हाताची.....
ताकत तुझ्यातच जाण हं.....
परिस्थिती बदलण्याची....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

योग्य वेळेची वाट.....
नाही हं बघायची.......
कधी जाईल ती आवाक्याबाहेर......
शाश्वती तीची कुणी बर घ्यायची....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

परिस्थिती चांगली असता.....
चुक ही गम्मत म्हणून स्विकारली रे जाते....
परिस्थिती वाईट होता....
गंम्मत चुक म्हणता नाते नाकारले रे जाते...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

परिस्थितीने भाग पाडल....
चुकीच त्याला वागायला....
जन्मभर द्यायची होती  म्हणे साथ....
आला होता सोडून जातांना सांगायला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

परिस्थिती कशीही असो.....
तूटायच नाही रे बर......
मुर्ती तूटता घराबाहेर ठेवतात.....
माणसांच इथे नाही रे काही खर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नीयती बदलते .....
परिस्थिती कधी.....
मनस्थिती बदलावी.....
सांगते ती आधी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                             शाही....✍️✍️

🙏🙏माझ्या वाचक परीवाराची मनापासून साँरी म्हणते आणी दिलगीरी व्यक्त करते.खूप दिवसांपासून मनात असूनही मी पोस्ट टाकु शकली नाही.त्या माझ्या वाचक वर्गाला मनापासून धन्यवाद🙏🙏 😊,माझी पोस्ट नाही दिसली तर आवर्जून मँसेज करून काळजीने विचारपूस केली.आई ची तब्यत बरी नाही कळता मला धीर देत प्रार्थना केली.या अमूल्य सहकार्यासाठी खुप खुप धन्यवाद.🙏🙏आता नवीन जोमाने सगळ्यांनी आवर्जुन वाचा आणी कमेंट्स करा.आपला अमूल्य वेळ देण्यासाठी खुप खुप धन्यवाद🙏🙏😊



 

20 February 2022

चारोळी संग्रह... 20/2/2022

एक सुंदर स्वप्न....
वेड रे लावून जातो....
डोळे मीटताच स्वप्नी येऊन....
मी तूझाच गं  म्हणून तो जातो...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


काही स्वप्न शेष आहेत....

त्यासाठी रे जगतेय....
सावल्यांच्या खेळात बघ ना....
नियती कशी हरायची वाट बघतेय....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वप्नांच्या ढिगार्यात.....
किती स्वप्न रे गाडली जातात....
कर्तव्य नी दूनियादारी जपता....
कितीदा रे ती जाळली जातात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सुंदर स्व्प्न आहे....
तुझ्या हसण्याच रे कारण व्हायचय...
शेवटच्या श्वासापर्यंत....
तूझच रे आहे रहायचं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

असचं रे राजा तूला.....
हसतांना रे पहायचं.....
जीवनाच सुंदर स्वप्न....
सोबतीने तूझ्या जगायच....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

येईल ग भेटायला स्वप्नात....
असे तो बोलून गेला....
जागरणाला पूर्णवीराम....
आहे ग तो म दिला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वप्न हे कधी कधी....
खरच हवे वाटते.....
सुटलेल्या हातांना भेटण्याच....
हक्कांच ठीकाण गाठते...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जीवन हे आशेवरच....
जगायचे रे असते.....
अपूर्ण राहणार्या ईच्छेलाच....
स्वप्न म्हणायचे ना असते.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एक सुंदर स्वप्न....
रोज आता पहाते...
आईने चालाव घरभर....
मनात एकच रहाते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एक सुंदर स्वप्न....
वाटत रे पडाव.....
पतंग होऊन कधी....
नभात स्वच्छंदी उडाव....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                    शाही.....✍️✍️


सुंदर स्वप्न... 20/2/2022

सुंदर स्वप्न
शाप अपूर्णत्वाचा
मोह मनाचा

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माझं एक स्वप्न.....
डोळ्यात त्याच्या लपलेल....
ऋणानुबंध अस गोड......
मनाशी मनाचं जपलेल.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माझ्या शब्दफुलांना.....
मनामनात ग जपल जावं....
या सुंदर स्वप्नाने.....
डोळ्यांच्या पालखीत रोज गं याव.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

न भेटणार्यांबरोबर ही.....
स्वप्नात मैफील ना रंगते....
स्वप्नांची ही जादूच ग.....
मोह स्वप्नांचा पाडते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एक स्वप्न आई.....
लेकरांच्या सुखाच रोज बघते....
प्रार्थनेतही आपल्या ती....
शंभरदा  हेच मागते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एक सुंदर स्वप्न....
जातीभेद,लींगभेद संपून रे जावा....
माणसाने माणसापरी...
माणूसकीला जपून घ्यावा...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

समजून घेतली जाईल ती.....
स्वप्न रोजच पडलेलं....
उद्या होईल पुर्ण म्हणता....
रोजच तीला छळलेलं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खुप आहेत रे स्वप्न.....
कस धाऊ स्वप्नांच्या मागे....
चंद्रमौली झोपडी माझी.....
राजमहालाचे स्वप्न न भागे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हाताच्या ओंजळीत....
स्वप्न किती रे रेखाटलेली....
मुठ घट्ट आवळून ही....
होती रे खूप सांडलेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आपलं ते सुंदर घर....
नाही रे नुसत्या भिंती...
जगण्यासाठी वीणलेल सुंदर स्वप्न...
रहाव सलामत प्रार्थना रे मनामंधी...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एक सुंदर स्वप्न....
असही जपल बर....
अबोल आपल प्रेम...
स्वप्नात तरी खुलाव खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                      शाही.....✍️✍️


आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...