राजा राणी च्या कथा....
आजही रे आठवतात.....
शेवटी सगळ छान होतं.....
आशावाद मनात ना साठवतात....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
भावनेच्या भरात...
वचन देऊ नये कधी.....
राजघराण्यातील कथेने....
निती ही शीकवली आधी...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तह आणी करारातून.....
शान त्यांनी जपलेली.....
कीती राजघराणी.....
इतीहासात अशी लपलेली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
सलीम आणी अनारकलीची.....
आठवते का प्रेम कहाणी......
प्रेमाला वीरोध करणारी....
होती काही राजघराणी.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
राजघराण्यातही स्त्रीयांची....
व्यथा नाही कमी बरं.....
अग्निपरीक्षा आणी वस्त्रहरण....
आहेत ज्वलंत उदाहरण खरं.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आठवते राजघराण्यातील ....
ती प्रेम कहाणी का तूला....
निरपेक्ष प्रेमाची जी.....
नल दमयंती यांची आवडते मला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
राजघराणे लयाला जाण्याची.....
नक्की वाचा कथा......
गोपीकाबाईंनी लीहीली.....
आपल्या आत्मवृत्तात ही व्यथा.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कथा राजघराण्याची....
अशीही ऐकली.....
हक्कासाठी जीथे.....
महाभारत घडली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
राजघराण्यातून व्हायची म्हणे.....
प्रधा, चालीरीतींना सुरवात.....
सामान्य जनता ठेवायची.....
आदर त्यांचा मनात....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कथा एका राजघराण्याची.....
लीहीली असती खरं.....
त्याग नि बलीदान....
शब्दांत मांडता येत नाही बरं...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कथा एका राजघराण्याची.....
आजी नेहमी सांगायची.....
राजाची एक आवडती राणी.....
हमखास त्यात असायची.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
राजघराण्यांच्या कथांनी....
इतीहास भरलेला.....
काही चुका पुन्हा करु नये....
यासाठी का रे तो रचलेला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
एका राजघराण्याची....
वाचली होती कथा.....
त्यातही मांडल्या होत्या....
स्त्रीयांच्या व्यथा......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही....✍️✍️