20 December 2022

भरकटलेली आत्मा....चारोळी संग्रह

भरकटलेली आत्मा होती......
म्हणून तीने आत्महत्या केली.....
हुंडाबळीची केस अशी......
होती भरकटवुन दिली......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

विश्वव्यापी तो
अविनाशी तत्व आहे
आत्मा आहे

ज्योत आहे ती
जाणिव नेणिव ती
हो चैतन्य ती

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भरकटलेली आत्म्याची.....
सावली म्हणे तीच्यावर......
बलात्कार कीती झाली......
वशिकरणाच्या नावावर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भरकटलेली आत्मा म्हणत.....
त्या मनोरूग्णाचा छळ केला.....
अंधविश्वासाचा हा खेळ.....
कीती अज्ञांनिनी केला......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भुत लागत तुला.....
नेहमीच तो ग म्हणतो.....
तीच्या रागराग करण्यालाही....
दोष तीचे कुठेना गणतो.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काम,क्रोध,लोभ.....
या शत्रूंमध्ये अडकली होती....
आत्मा मग ती.....
भरकटली होती.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भरकटलेली आत्मा......
अशिही दिसली.....
मोह मायात ......
होती ती फसली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आत्मसंयमी होऊन .....
सर्वशक्तिमान व्हावे......
भरकटलेली आत्मा ती.....
कोण तीला समजवावे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेदना सरली की.....
चेतनाही हरते......
भरकटलेली आत्मा.....
अशिही ठरते......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माणुसकी हरवलेली......
जणु जीवंत प्रेत होती......
भरकटलेली आत्मा ती......
शरीर पांघरून फीरत होती.......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जय पराजयाने.......
पश्चातापात विलीन होत होती......
भरकटलेली आत्मा अशी.......
हळुहळु लीन होत होती.......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सांसारीक लोभात.....
अडकलेली होती.......
भरकटलेली आत्मा.....
ती एक होती.......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आत्मा भरकटण्यासाठी.....
कारण ठरली होती.......
आत्माचे पतन म्हणजे.......
पाप ती घडली होती.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कल्पना ही.......
आत्म्याचे जणु डोळे.......
तीलाच आज......
भरकटवायचे होते थोडे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आत्मज्ञान हे......
सर्वश्रेष्ठ ज्ञान.......
भरकटलेल्या आत्म्याला.....
उशिरा आले हे भान....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

संपुर्ण विश्व जींकुनही.....
लाभ नाही त्याला.....
आत्माच ज्याचा.....
भरकटुन गेला......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चिंता ती......
मांडून गेली खेळ......
भरकटवुन गेली आत्मा.....
साधुन वेळ......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शांतता आणी आनंद......
हवा असेल जीवनात.......
भरकटु द्यायच नाही आत्म्याला.......
गाठ बांध ही मनात......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

इच्छा नि महत्वाकांक्षांचे......
आवाज  ते वाढले होते......
आत्म्याला न समजुन घेता......
भरकटण्याचे खेळ मग झाले होते......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लेखक म्हणता अपरीहार्य.....
कल्पनेच्या जगात रमायचे......
पण अंधश्रध्दा वाढीस लागेल.....
असे विषय तुही ग टाळायचे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही✍️✍️....


19 December 2022

निर्भय....चारोळी संग्रह

निर्भय होते वेडु......
फक्त तुझ्या पुढे......
तुच तर वेड्या मज.....
जग माझे वाटे.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कुप्रथांवर मत.....
निर्भिडपणे ती मांडते......
निर्भय होऊन अशी......
लेखणीतुन ती सांडते.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निर्भय रहाते......
घाबरत नाही कशाला......
पण आपल्यांना गमावण्याची भीती.....
असतेच  रे उशाला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हायकु....(5-7-5अक्षर संख्या)

निर्भय राहु
सांग कशी घरात
अरे गर्भात

निर्भय राहु
स्वप्न जगात कारे
छळत नारे

निर्भय राहु
बोलता की हसात
कुणी नसता

निर्भय राहु
आवडेल ना तुला
प्रश्नच मला

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जे करायला .....
वाटते ना भीती.....
निर्भय होण्यासाठी....
ते कर आधी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जीथे तुझी .....
नाही ग चुक....
निर्भय तु.....
तिथे रहा बघ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गाव,अंगण....
बाजार गल्ली.....
निर्भय होऊन सांग ना....
जाऊ कुठे  रे हल्ली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निर्भय असेल....
तुला व्हायचे.....
सत्याचे मार्ग....
नेहमी  तु घ्यायचे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भितीच्या आड.....
नको गं लपायला....
निर्भय होऊन ......
हवे हक्क तु मागायला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निर्भय होऊन......
कसं ते जगाव......
भारतीय जवानाकडुन......
खर रे तु शिकावं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निर्भय होण्याच......
खुप असत मनात.......
पण तुला गमवण्याची भीती.....
छळते क्षणा क्षणात......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निर्भय होऊन......
जेव्हा ती व्यक्त होते......
समजुन घेण्याऐवजी......
संस्कारावर प्रश्न फक्त होते......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निर्भय होऊन.....
आहेच रे जगायच.......
गर्भात कळी खुडल्यावर....
न्याय कुठे पण मागायचं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

 अस निर्भय होण तुझ......
मला नाही कळल......
गमवुन कुणाला तुझ......
मनही  जरा नाही छळल......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आत्मविश्वास ज्याच्या.....
असतो मनात.....
निर्भय होतो......
तो रे जीवनात......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निर्णय तोच.....
असतो बरं.....
निर्भय होऊन.....
घेतो जो खरं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आनंदी असेल....
तुला  जर रहायचं.....
तर निर्भय.....
  तु  मग व्हायचं...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निर्भय होण्याच.....
गुपीत ग छान.....
तूच तूझ बळ......
आधी हे जाणं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शिक्षण माणसाला.....
निर्भय  रे बनविते......
सुंदर आकार जीवनाला देऊन.....
स्वाभिमानाने जगवीते.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निर्भय होऊन.....
ध्येय तु ग गाठ......
सोडू नको कधी.....
परीश्रमाची बर पाठ.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निर्भय असते रे.....
तु आसपास असतांना.....
आत्मविश्वास वाढतो.....
तु सोबत असतांना......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                        शाही✍️✍️....


18 December 2022

चांदण्या रात्री--चारोळी संग्रह

चांदण्या रात्री.....
त्याची ग तु व्हावी......
ज्याला तु.....
अबोलही ना कळावी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चांदण्या रात्री......
सोबती ग सखा खास.....
त्याच्या पुढे फिके.......
चंद्र नी चांदण्याची रास.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चांदण्या रात्री......
मनाने तु हसावी......
दुःख सारी.....
अशी ग ओसरावी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चांदण्या रात्री......
वार्यावर डोलतात ती फुल पान.....
तुझ्या बटांमध्ये अलगद...
गुंतत जातं ग मग मन....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चांदण्या रात्रीचा.....

  आठवतो नौका विहार......

जाणवतो  रे आजही.....

तुझ्या बाहुपाशाचा तो हार......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चांदण्या रात्रीचे ते स्वप्न......
सारेच आता विसरुन जा......
होती मी कधी तुझी.......
हक्क सारे हे विसरून जा......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चंद्रकोरावर हळुवार.....
झुलवतो चल  ग तुझ झुला....
चांदण्या रात्री नको ना.....
वेडे जीवघेणा हा अबोला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शुक्राची चांदणी......
चंद्रकोराला बिलगुन बसते.....
अशीच रे छबी तुझी......
माझ्या वेड्या मनात असते......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काजव्यांशी नको......
तोडू बर रे मैत्री.......
चांदण्या रात्रीची.......
नसते तशी खात्री......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चांदण्या रात्री.....

ते निसर्गाच्या जवळ येणं.....

जणु विरहा नंतर......

तुझ ते मिठी घेणं ......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चांदण्या नि चंद्र......
बघ रात्री नभात.......
जणु सखा ग गुंग......
मीत्रांसवे गप्पांच्या मैफीलीत.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चांदणी रात्र.......
पांघरली ग त्या निसर्गाने....
जशी भेटताय चोरून.....
दोन अवखळ ती  मने.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चांदण्या रात्री......

परीमळ तो फुलांचा.......

जणु तारे सांडताय रे.....


सडा इत्राचा.......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चांदण्या रात्री......
आठवतं तुझ ते गुणगुणन.......
गोड त्या सादेत आवडलं होत.....
तु माझाच हे रे म्हणणं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चांदण्या रात्री.....
तारा एक तुटावा.....
मागेन पुन्हा त्याला.....
जग जो माझा मज गं वाटावा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चांदण्या रात्री सांगीतले......
कीस्से आपले तार्यांना......
लुकलुकणं त्यांच सांगे जाणु......
आनंद होतोय ऐकुन ते सार्यांना.......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चांदण्या रात्री........
कीती दुखत रे मन.......
जेव्हा लुकलूकतात तुझ्या......
आठवणींचे सारे क्षण.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ्या शिवाय नाही कुणी....
बघ ना येऊन ह्दयाच तळ....
चांदण्या रात्रीच्या या.....
अबोल चांदण्यांची तुझरे गळ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सोडणार नाही साथ म्हणत......
दिली होती तु खात्री........
चांदण्याची ती वरात........
नी आठवतात त्या रे चांदण्या रात्री........

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चांदणी रात्र.....
नी हाती तुझ्या हात....
ह्दयातुन ती.....
आठवण नाही जात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चांदण्या रात्री.....
आजही बघते......
नभातील शशीत....
भास तुझे जगते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चांदण्या रात्री.....
रातराणीचा सुवास.....
आजही भासतो.....
तु रे आसपास....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चांदण्या रात्री.....
येशील का भेटायला....
आवडत आजही.....
वाट ती बघायला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही✍️✍️....


17 December 2022

मेंदीचा रंग....चारोळी संग्रह

मेंदीही  बघना जणु......
गोड ती लाजली.......
तुझ नाव लीहीता.......
लाल रंगात भीजली.......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

घेतोस का   रे तुही परीक्षा.....
सांग कधी प्रेमाची अशी माझ्या......
गिरवलीत का  रे कधी तु......
नाव माझी मेंदीत तुझ्या.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कीती लाजली  ती पाहुन.....
गहीरा रंग तो मेंदीचा.....
आठवला होता क्षण तीला तो.....
खोडकर त्याच्या प्रितीचा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माझ्या मनाचा मी गं मालक......
म्हणत मर्यादा तो गं हरला....
मेंदीचा रंग गडद तो.....
फोल होता मग ठरला......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मेंदीचा रंग गहीरा......
प्रेमाचा प्रतीक कसा बरं.....
लवंग नि निलगिरीनेही.....
गडद होतो ना रंग खरं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ प्रेम नाही म्हणत....
कारे बर ते छळू तुला......
टेनिन रसायनामुळे गडद रंग.....
मेंदीचा लागल आता रे कळु मला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मेंदीचा रंग गहीरा.....
जणु सांगत होता  हातावर.....
तूझेच नाव कोरले......
बघना वेडु ह्दयावर......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मेंदीचा रंग गहीरा......
प्रतिक रे आनंदाचे......
समर्पण नी स्नेहाचे रंग.....
सासरी ते उधळण्याचे......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मेंहदीचा रंग गहीरा नसला की.....
प्रेम नाही ना तुझ म्हणत असते......
तीच्या या निरागस रुसण्याने....
मन ती वेडी मोहुन बसते.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मेंदीचा रंग गहीरा.....

चढला रे असा......

तुझ्या प्रेमाचा रंग......

जणु श्वासा श्वासात जसा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गालावरची ती लाली......
सांगत होती  ग गुपीत......
मेंदीच्या गडद रंगात......
होती तु नाव कुणाच लपवीत.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

समर्पणाशिवाय रंग नाही......
सांगुन होते गेले......
गहीरे रंग मेंहदीचे......
हातावर जे आले.......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मेंदीचा रंग गहीरा......
अपरीहार्य रे फीका पडणं.....
नात्यातुन नको पण.....
समर्पणाचा रंग तो हरणं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

करतो गं तो वेडा......
प्रेम हरवुन भान......
मेंदीचा रंग गहिरा.......
दाखवत होतं हे छान.......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रत्येक नात्यात तुही.......
समर्पणाने ग रंगायचे.....
नववधुच्या मेंदीच्या गहीर्या रंगात....
अर्थ हे ही का रे दडायचे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हातावर मेंदीचा.....
रंग गहीरा लाल.......
जणु सांगतय तुझं.......
प्रेम कीती बेमीसाल......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मेंदिचा रंग गहिरा.....
प्रतिक आपल्या प्रेमाचा.....
जणु सांगतोय चढला आता.....
रंग आपल्याला एकमेकांचा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वतः  नाहीसी होऊन.......
रंग आनंदाचे ठेऊन गेली......
मेंदीची पान ही गं......
भास  स्त्रिचे देऊन गेली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नविन नात्यांचे रंग.......
जीवनात होते आले.......
मेंदीचे रंग गहीरे......
सांगुन होते गेले.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ्या नावाच्या मेंदिला.....
गहिरा आला रे रंग......
जणु सांगत होता चलशिल....
आजन्म तु संग....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मेंदिचा गहिरा रंग.....
आला होता रे हाती.....
तरी का नाही रे.....
जुळली सांगना आपली नाती.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही✍️✍️....


चारोळी संग्रळ....

क्रिमिनल ना
धर्म की जात बर
विकृती खरं

क्रिमिनल ना
परीस्थिती असते
हो ती फसते
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रतिशोध घेण्याची.....
मानसिकता रे वाढली.....
क्रिमिनल केसमागची.....
कारण हीच कळली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दोन वेळच्या जेवणासाठी....
तो बाल अपराधी झाला होता....
क्रिमीनल केस समाजावर लादण्याचा....
विचार मनात मग आला होता....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

समाजात गुन्हेगाराला.....
पाठींबाच जणु दिला जातो.....
गुन्हा मोठा घडला तरी.....
दोष तीच्या कपड्यांवर लादला जातो.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जोवर अपराधी.....
निर्दोष होऊन सुटतील.....
क्रिमीनल केस समाजातील....
सांग कशा बर थांबतील....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्राइम पट्रोल पाहुन...
अशी ती वागते.....
सगळ्यांना आता....
संशयी नजरेने बघते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

विश्वासाने विश्वासाचा.....
गळा तो कापला जातो.....
क्रिमिनल केस मध्ये.....
हा गुन्हा   का रे मानला  जातो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दगड जपण्यात......
फुल ती कुस्करली गेली.....
क्रिमिनल केस ही.....
कुठे न नोंदली गेली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्रिमिनल केस नाही....
पण आरसाच छळुन जातो....
नकळत गुन्हा कधी.....
असाही घडुन जातो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मन आजही.....
जमानत तुझी देते.....
निश्चित येशिल तु फीरून....
वाट रे मी पहाते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कबुल नाही केला त्याने....
प्रेम केल्याचा गुन्हा.....
त्याच्या डोळ्यांनिच दिली......
ग्वाही त्याच्या विरूध्द पुन्हा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्रिमिनल केस करता येते.....
धमकी देणार्यांवर.....
पण हक्क आहे त्यांचा म्हणत.....
नाही घेत ती मनावर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्रिमीनल केसचा तो गुन्हा.....
आजन्माचा  दाग. झाला....
कोर्टाने निर्दोष साबित करूनही.....
जगाने माफ नाही केला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

किती क्रिमिनल केस.....
घडताय समाजात.....
का नाही उरलाय......
कायद्याचा धाक मनात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वासनांध नजरेने.....
जणु बलात्कार तीचा होतो.....
क्रिमिनल केस मध्ये सांग ना....
हा गुन्हाही ना येतो...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शाब्दीक मार.....
जे मारून गेले......
क्रिमीनल केस मधुन.....
का त्यांना गाळून दिले......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चोरी करणार्यांवर......
क्रिमिनल केस ना गं होते......
झोप गं त्याने चोरली माझी.....
सांगना एफ. आय. आर.कुठे दाखल होते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खुन करणार्यांवर......
क्रिमिनल केस ना दाखल होते.....
कीती भावनांचा खुन होतो.....
पण केस  दाखल कुठे रे ती होते.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनानेच माझ्यावर.....
क्रिमीनल केस रे फाईल केली....
मी खुपदा म्हणे त्याला.....
मरण यातना दिली...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्रिमिनल केस.....
कुणाविरूध्द लढायची.....
आपलेच दात नि.....
आपलेच ओठ असायची....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्रिमिनल केस.....
ती ही का होईल.....
भावनांना जेव्हा....
कुणी छळून जाईल.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेडु तु जणु....

भविष्याची आरोळी.....

तूझ्यासाठी गुंफली....

बघ सुंदर रे चारोळी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                         शाही✍️✍️....


आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...