कोणाला काही सांगत नाही....
पण समजून घ्यावे ही अपेक्षा असते....
भावनीक आधारासाठी ती परक्यात....
आपलेपणा शोधतांना दिसते...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दुनियादारी आता ....
हळुह्रळु मी ग जाणली....
अपेक्षांच्या गर्दीशीही खुपदा...
अनोळखी होऊनच वागली...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
सामाजिक अपेक्षांची गर्दीच....
बघ्याची भूमिका जपते....
खुपश्या स्वप्नांची धुळमाती .....
परंपरेच्या नावाखाली लपते.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अपेक्षांची गर्दी ....
बघण्यासाठी ग थांबलेली....
स्वप्न नी कर्तव्यात स्वप्नांची....
धुळमाती अपरिहार्य हे मी जाणलेली...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अपेक्षांची गर्दी.....
घोळ सारा ग घालते....
त्यामूळेच स्वप्नांची....
धुळमाती होते...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
माझ्या माणसांच्या अपेक्षा....
स्वप्न माझं ग झालेल...
धुळमाती न हो त्याची....
यासाठी जीवापाड जपलेल....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
अतिशय सुंदर..👌👌👍
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏😊😊
Deleteअप्रतिम रचना👌👌👌👌👌👌👌
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏😊😊
ReplyDeleteखूपच छान
ReplyDeleteअप्रतिम...लिहिल ...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹💖💖
ReplyDeleteKhupch sundhar apratim 👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫
ReplyDelete