29 November 2021

सुगावा कुठे लागला... 29/11/2021

तिच्या  लाजण्याचा सुगावा....
कुठे त्याला ग लागला.....
माझ्यासाठीच हे लाजणं या भ्रमात....
तो  किती राती गं जागला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हाती काही  लागलेच नाही ....
सारच सुटलं होतं .....
तिला सुगावा लागला .....
त्याला संशयाने गाठलं होतं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

राग तुला क्षणात कळतो....
प्रेमाचा सुगावा का रे लागत नाही ...
समजायला जाते प्रत्येक  वेळी  तुला....
पण हाती काही  लागत नाही ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हाती काही  लागलेच नाही ....
भेटणच ती टाळत गेली.....
प्रीती चा सुगावा लागू नये म्हणून ....
बंधनात स्वतःला  जाळत गेली...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हाती काही लागलेच नाही ....
कागदावर शब्द हे सांडून....
सुगावा नाही  लागला  तीला....
प्रेम  शब्दफुलात ही मांडून...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁



सुगावा नाही  लागला असा.....
चोर पावलांनी तो मनात शिरला....
हाती काही  लागल नाही  पण....
तो आणी तोच माझ्यात उरला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सुगावा लागू देत  नाही  ती....
पण डोळे  तीचे बोलून जातात....
हाती काहि लागत नाही ....
वादळ ही अशी लपून जातात...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हाती काही लागले नाही ....
भरून आले  आभाळ जरी....
सुगावा लागू नाही  दिला दुःखाचा....
कितीही तीचा मी असलो तरी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                  शाही..... ✍️✍️


7 comments:

  1. खूपच छान चारोळ्या...👍👌✍️🌸

    ReplyDelete
  2. धन्यवाद सखी 🙏🙏😊😊

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर रचना केली सखी ✍️🌟👌👍👍

    ReplyDelete
  4. अप्रतिम ....खूपच सुंदर ....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🍫🍫🍫💖💖💖🙏🏼🙏🏼🙏🏼

    ReplyDelete
  5. अप्रतिम चारोळ्या👌👌👌👌👌👌

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...