तिच्या लाजण्याचा सुगावा....
कुठे त्याला ग लागला.....
माझ्यासाठीच हे लाजणं या भ्रमात....
तो किती राती गं जागला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
हाती काही लागलेच नाही ....
सारच सुटलं होतं .....
तिला सुगावा लागला .....
त्याला संशयाने गाठलं होतं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
राग तुला क्षणात कळतो....
प्रेमाचा सुगावा का रे लागत नाही ...
समजायला जाते प्रत्येक वेळी तुला....
पण हाती काही लागत नाही ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
हाती काही लागलेच नाही ....
भेटणच ती टाळत गेली.....
प्रीती चा सुगावा लागू नये म्हणून ....
बंधनात स्वतःला जाळत गेली...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
हाती काही लागलेच नाही ....
कागदावर शब्द हे सांडून....
सुगावा नाही लागला तीला....
प्रेम शब्दफुलात ही मांडून...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
सुगावा नाही लागला असा.....
चोर पावलांनी तो मनात शिरला....
हाती काही लागल नाही पण....
तो आणी तोच माझ्यात उरला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
सुगावा लागू देत नाही ती....
पण डोळे तीचे बोलून जातात....
हाती काहि लागत नाही ....
वादळ ही अशी लपून जातात...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
हाती काही लागले नाही ....
भरून आले आभाळ जरी....
सुगावा लागू नाही दिला दुःखाचा....
कितीही तीचा मी असलो तरी....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही..... ✍️✍️
खूपच छान चारोळ्या...👍👌✍️🌸
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊😊
Deleteधन्यवाद सखी 🙏🙏😊😊
Deleteधन्यवाद सखी 🙏🙏😊😊
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना केली सखी ✍️🌟👌👍👍
ReplyDeleteअप्रतिम ....खूपच सुंदर ....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🍫🍫🍫💖💖💖🙏🏼🙏🏼🙏🏼
ReplyDeleteअप्रतिम चारोळ्या👌👌👌👌👌👌
ReplyDelete