03 November 2021

सारेच क्षण आठवतात.... 3-11-2021

बालपणीचा तो काळ सुखाचा 
त्या गल्या  त्या बोळा
सख्यांसोबतचा बर्फाचा गोळा 
सारेच क्षण ते आठवतात....
डोळे  नकळत  पाणवतात... 
माहेरची  ती वाट
जणू सुखाचा तो घाट
आई बाबां भावंडांचा  लळा
प्रेमाचा तो फुलतो मळा
नात्यांची  ती उब
लाड ते खूप 
सारेच क्षण ते आठवतात... 
डोळे नकळत पाणावतात.... 
सखींसोबतची उनाड खोडी
जपलेल्या गूपीतांची गोडी
मनाचा कोपरा आजही गाजवतात
सारेच क्षण ते आठवतात ....
डोळे  नकळत पाणवतात ....
साजणाच्या दारी
नविन नाती सारी
सूख-दू:खांच्या हिंदोळ्यांवर 
संसाराची गाडी
मात्रूत्वाच ते  उमलण
आई म्हणून, मला फूलवण
सारेच क्षण ते आठवतात... 
डोळे  नकळत पाणवतात.... 
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


10 comments:

  1. अतिशय सुंदर 👌👌👌

    ReplyDelete
  2. Beautiful line ❤...

    ReplyDelete
  3. धन्यवाद सखी 🙏🙏😊

    ReplyDelete
  4. खुप सुंदर, अप्रतीम रचना , ह्रदयस्पर्शी...👌👍💐🍫

    ReplyDelete
  5. Khup khup khup mast apratim rachna 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗❤❤❤❤❤❤❤💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...