गुंतायच नाही तुझ्यात....
सांगायला होती ती आली.....
मिठीत रडून सोडणार नाही ना...
वादा हाच ती घेऊन गेली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
गुंता हा सोडवायचा म्हणता....
कसा ना तु गुंतवत जातो.....
अलगद वाटे सोडवावं हे कोड....
तर श्वासात तू का उरून रहातो...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
गुंता तूझ्या माझ्या प्रेमाचा....
कळला कुठे तूला.....
कळूनही मला कुठे .....
सोडवता तो रे आला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
साद देऊन हळूच म्हणतो....
काळजी घे गं स्वतःची....
वेळ नाही ग बोलाया....
लगबग आहे कामाची...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कधी कधी कळत नाही म
जपणं आहे की टाळणं त्याचं
अशा या गुंत्यातून
सहज का होईल सुटण तीचं
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
गुंतून न पडता.....
गुंता का गं सुटतो....
मनाचा हा खेळ.....
ठरवून कुठे घडतो....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
गुंतून न पडता कुठे .....
गुंता हा सोडवावा वाटे .....
उन सावल्यांचा खेळात.....
हसून वेचावे गं काटे....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
गुंतून पडले तुझ्यात.....
नाही सुटणार रे हा गुंता....
तुला माझा म्हणता....
सोडली रे दुनियादारीची चिंता ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
गुंतून न पडता....
गुंता नात्यातला सोडवावा....
अपेक्षांच्या धाग्यांना....
अलगद रे दुरावा द्यावा....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
गैरसमजांना उणे करून.....
आपल्यांनाच बेरीज करते.....
गुंतून न पडता स्वार्थोत.....
नाते किती ती जपून धरते ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही... ✍️✍️
👌👌
ReplyDeleteधन्यवाद सर 🙏🙏😊😊
Deleteअतिशय सुंदर रचना केल्या आहेत👌👌👌👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद दादा 🙏🙏😊😊
Deleteधन्यवाद सखी 🙏🙏😊😊
ReplyDeleteKhupch sunder 👌👌👌
ReplyDeleteखूप खूपच सुंदर
ReplyDeleteKhupch sundhar lihale di ✍🏻✍🏻✍🏻✍🏻🍫🍫🍫🍫🍫
ReplyDelete