अनाथ म्हणून नको दिखावा....
माझी मी रे जगून घेईल .....
दीखाव्याची लाट ती ओसरेल....
पण नात्यातल्या विश्वासाचा रे जीव जाईल....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नको मला ते....
प्रेम ते उसनं....
सोबत असून....
परक्यासम भासणं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नको प्रेम हे उसने ही....
आलेली लाट परतेल ही।....
दीखाव्याची आपूलकी...
दुनियादारी कळेल ही...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आलेली लाट बेगडीपणाची....
तूझी आता समजली.....
नको प्रेम हे उसने ही....
वेळीच मी सावरली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रेम म्हणजे भावनांचा खेळ....
तुझा मला उमजून गेला....
नको प्रेम उसनं तूझ....
आलेल्या लाटेला परतवण जमेल मला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नको प्रेम हे उसनं ही.....
आलेली लाट परतेल ही.....
वेळीच टाईप पास त्याचा कळावा....
भावनांचा खेळ कुणाचा ना घडावा....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तूझ्या उसन्या प्रेमाला....
दिल प्रेमाने उत्तर ....
एकनिष्ठता नात्यातली...
राहीली रे निरुत्तर ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तूझ उसनं प्रेम .....
हव तेव्हा जागतो....
गरज संपता......
गोड बोलून टाळतो ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
लाट प्रेमाची
त्याग शिकवते ती
जगवते ती
उसनं प्रेम। ( हायकु)
क्षणभराचा भास
आजन्म त्रास
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उसनं प्रेमच तर.....
तीच्या भाळी लीहीलेल....
परकेपणाच्या लाटेतच.....
अस्तित्व वाहून गेलेलं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
हवं तसं नाही वागली....
तर प्रेम माझ उसनं का....
दिले की सर्वस्व तूला...
त्यावर तूझ हे पूसणं का....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही...... ✍️✍️
👍👍
ReplyDelete🙏🙏🙏😊😊
Deleteखूप छान रचना 👌🏼👌🏼
ReplyDeleteधन्यवाद दादा 🙏🙏😊😊
Deleteअप्रतिम....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🍫🍫💖💖
ReplyDeleteKhupch mast lihale khup khup chan ✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻👌👌👌👌💞💞💞💞💞💞⭐⭐⭐⭐⭐⭐
ReplyDelete