माझी आणि एकांताची.....
खूप गोड मैत्री गं.....
उत्तम स्वतःशी संवाद घडवण्याची....
देतो तोच खात्री गं.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नकोसा वाटतो तो एकांत ....
जिथे तू शून्यात हरवतो.....
शोध स्वतःचा घेतो म्हणता.....
भविष्याच्या चिंतेत स्वतःला गमवतो......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
वाटतो संवाद साधावा.....
कधी तो स्वतः शी....
एकांत ही म बोलका होतो....
जणू मैत्री जुनी त्याच्याशी....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
स्वतःशी संवाद साधायला ......
एकांत तो बरा असतो......
खूप गर्दीत ही आपलं कोण.....
प्रश्न हा खरा असतो.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
स्वतःशी संवाद साधतांना.....
आरसाही रे हसला होता .....
उगाचच गं म्हणे तू......
काच हा पुसला होता....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नको असलेल्या एकांताशी.....
मी रे गट्टी केलेली.....
तु रहा कामात व्यस्त......
तुझ्याशी कट्टी केलेली......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
काळजावर लागलेले घाव....
एकांतात रे गळतात.....
असे स्वतःशी संवाद .....
अश्रृंमार्फत घडतात....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नको असलेला एकांतही.......
खूप काही शिकवून जातो......
सावलीही साथ देत नाही......
संवाद असा स्वतःशी घडवून जातो......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
एकांत असा.....
खूप गं छळतो.....
सोबतीने तुझ्या......
गोडवा गं त्याचा कळतो.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही..... ✍️✍️
अतिउकृष्ठ रचना केल्या आहेत👌👌👌👌👌👌
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद दादा नेहमीच प्रोत्साहनपर समीक्षेसाठी 🙏🙏😊😊
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद दादा नेहमीच प्रोत्साहनपर समीक्षेसाठी 🙏🙏😊😊
ReplyDeleteखूप खूपच सुंदर
ReplyDeleteKhupch sundhar lihale di ✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻💐💐💐
ReplyDelete