22 December 2021

एकांत असा.... 22/12/2021

माझी आणि  एकांताची.....
खूप  गोड  मैत्री गं.....
उत्तम  स्वतःशी संवाद  घडवण्याची....
देतो तोच खात्री गं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नकोसा वाटतो  तो एकांत ....
जिथे तू शून्यात हरवतो.....
शोध  स्वतःचा घेतो म्हणता.....
भविष्याच्या चिंतेत  स्वतःला  गमवतो......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वाटतो  संवाद  साधावा.....
कधी तो स्वतः शी....
एकांत  ही म बोलका होतो....
जणू  मैत्री जुनी त्याच्याशी....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वतःशी संवाद साधायला ......
एकांत  तो बरा असतो......
खूप  गर्दीत  ही आपलं कोण.....
प्रश्न  हा खरा असतो.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वतःशी  संवाद  साधतांना.....
आरसाही  रे हसला होता .....
उगाचच गं म्हणे  तू......
काच हा पुसला होता....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नको असलेल्या  एकांताशी.....
मी रे गट्टी केलेली.....
तु रहा कामात व्यस्त......
तुझ्याशी कट्टी केलेली......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काळजावर लागलेले घाव....
एकांतात रे गळतात.....
असे स्वतःशी संवाद .....
अश्रृंमार्फत घडतात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नको असलेला एकांतही.......   

खूप  काही  शिकवून  जातो...... 

सावलीही साथ देत नाही...... 

संवाद असा स्वतःशी घडवून  जातो......


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एकांत असा.....
खूप  गं छळतो.....
सोबतीने तुझ्या......
गोडवा गं त्याचा कळतो.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही..... ✍️✍️


5 comments:

  1. अतिउकृष्ठ रचना केल्या आहेत👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  2. खूप खूप धन्यवाद दादा नेहमीच प्रोत्साहनपर समीक्षेसाठी 🙏🙏😊😊

    ReplyDelete
  3. खूप खूप धन्यवाद दादा नेहमीच प्रोत्साहनपर समीक्षेसाठी 🙏🙏😊😊

    ReplyDelete
  4. Khupch sundhar lihale di ✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻💐💐💐

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...