तुझ्या ऊव्देगाची कल्पना ....
मला नाही करायची....
ती वेळ येण्याआधीच ....
मी रे तुला सावरून घ्यायची.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उव्देग नको ना करू गं.....
समजवून त्याच सांगण असतं.....
वादळ मनाची मला देना गं....
हक्काने हे मागणं असतं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उव्देग करते सारखी....
म्हणून तू रे बोलत असतो.....
भावनांचा वादळ समजून घेण्यासाठी ....
कधी मनाशी माझ्या संवाद का साधत असतो....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तीच्या ऊव्देगाची कल्पना नाही.....
का तर गृहीत ती रे धरलेली असते....
आपल्यांनीच परकेपणाचे ओझे लादून....
खूपदा अशी छळलेली असते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उव्देग तीचा.....
कधी कुणा कळला.....
पेलल नाही ओझं म...
अश्रृ वाटे तो गळला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुझ्या ऊव्देगाची कल्पना ....
आता नाही गं करायची ....
पायवाटेवर तूझ्या.....
फुल गं पेरायची......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अपेक्षांची ओझी....
माझी मला झेपत नाही ....
तुझ्या ऊव्देगाची कल्पना....
मला म जमत नाही....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुझ आणि माझं....
असं काही राहील का.....
सांभाळून घेऊ एकमेकांना ....
स्वप्न हेच पाहीले का.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
अप्रतिम खूपच छान रचना👌👌👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम रचना केली सखी👌👌👌👌👌
Deleteअतिशय छान
ReplyDeleteKhupch sundhar lihale di🥰🥰🥰🥰🥰 ✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻💐💐💐💐💐💐
ReplyDelete