ऊव्देगाची कल्पना ....
नाही ग करायची.....
ओझी माझी आता....
मलाच नाही पेलायची....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुझं ते चिंतेच ओझ.....
तुलाच रे झेपेना.....
तुझ्या काळजीने उव्देग वाढतो.....
कल्पनाही तूला ही करवेना....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुझ्या उव्देगाची.....
कल्पना ही करायची नाही .....
माझी ओझी तूला.....
आता झेलायची नाही .....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
ओझं जबाबदारी च....
नको ना लादून घेऊ....
सोबतीने चल ना....
तु मी वाटून घेऊ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
माझ्या कर्तव्यांची ओझी....
उव्देग तूझा रे वाढवून जातात.....
कल्पना करवत नसली तरी.....
वेदना तुझ्या जीव रे माझा जाळून जातात....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुझी न झेपणारी ओझी....
मला रे वाटायची......
माझ्या ऊव्देगाची कल्पना सोड....
तुला का सोबत अशी ही पटायची....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
ओझी भावनांची ....
नाही रे पेलतं.....
जपून घेईल मन....
असं नाही कुणी भेटत....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आम्हाला आमची ओझी....
मोठी ती वाटत गेली.....
खरच बळीराजा तुझ्या ऊव्देगाची ....
कल्पना ना कुणा आली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
बेरोजगार तरूणांच्या उव्देगाची....
कल्पना न केलेली बरी....
पदवीच्या ओझ्याखाली....
कितीदा तो जातो बळी....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
द्यायची आहे रे साथ.....
तुझी ओझी पेलण्यासाठी .....
होऊन राहीन सावली....
नेहमी रे तूझ्या पाठी....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
ऊव्देगाची तूझ्या ......
कल्पनाही कुणा नसते....
पुरुष म्हणून तुला तर....
रडण्याची मुभापण नसते...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
ऊव्देगाची तूझ्या ......
कल्पनाही कुणा नसते....
पुरुष म्हणून तुला तर....
रडण्याची मुभापण नसते...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
अतिशय सुंदर काव्य रचना👌👌👌👌👌👌
ReplyDeleteApratim rachna khup khup chan👌👌👌👌👌👌👌 ✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫
ReplyDelete