भावना कशा ना बेईमान असतील....
निर्मळ मनाची स्पंदन ती....
दखल योग्य ती घेता यावी....
आस प्रत्येक मनी दडली ही....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
भाव मनीचे ....
बेईमान झाले ....
त्याला कळण्याआधी...
निःशब्द झाले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
खूप दिवसांनी भेटला ....
आणि अलगद मिठीत शिरला होता...
साँरी तो म्हणता म्हणता...
बेईमान परीस्थिवर चिडला होता...
भाव त्याचे तेच होते...
तीला ही कळले होते ...
दखल जगरहाटीची नाही म्हणता ...
अश्रृ डोळयातून गळले होते ...
भाव तेच असतात...
बेईमान जगरहाटी करुन जाते...
दखल समजून घेण्याची घेतली की...
नाते हे अबाधीत रहाते...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दखल कशी घ्यावी .....
परीस्थिती ती बदलत असते....
गरज ती संपली की.....
भावना बेईमान होत असते...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
राग हि त्याचाच करते....
अश्रृ ही त्याच्या मिठीत गळतात...
बेईमान भावनांचे खेळ ...
तो समोर असता कुठे कळतात...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तूझ्या फक्त वीचाराने....
भावना बेईमान होतात....
कधी गाली हसतात....
कधी ओघळून वाहतात...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दखल कशी घेऊ...
या बेईमान भावनांची....
रूसताही ह्या तूझ्यावर...
आणि रडतात ही तुझ्याचसाठी ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
बेईमान झाल्या भावना ....
नाव तुझे ऐकताच....
बोलणार नाही ठरवल पण....
फितूर झाल्या तुला बघताच...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दखल कशी घेऊ.....
बेईमान त्या होतात....
दुनियादारी सोडून....
नको तिथे गुंततात...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नको छळू शशी.....
ढगाआड लपून.....
बोथट होतीत भाव....
लवकरच ये रुसवा सारून ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही..... ✍️✍️
अप्रतिम....खूपच सुंदर....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖💖💖💖💖🌹🌹🌹🌹🌹
ReplyDeleteफारच सुरेख रचना ✍️👌👌
ReplyDeleteअतिशय हळुवार रचना
ReplyDeleteजबरदस्त एक नंबर रचना✍️✍️✍️✍️👌👌👌👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिमच सखी मस्तच
ReplyDeleteजबरदस्त ��������������������
ReplyDeleteअप्रतिम रचना ❣️❣️❣️❣️❣️
Wowwwwww di khupch sundhar apratim rachna 💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞❤❤❤❤❤❤❤❤❤❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣
ReplyDelete