05 December 2021

कदाचित असेल मी भाग्यवंत.. 5/12/2021

कदाचित  भाग्यवंत  मी....
स्त्री जन्म  जे लाभले....
खंत  हीच भृणहत्येच्या खेळीली...
समाजाने का दूर नाही  सारले...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आहेच मी खरंच  भाग्यवंत....
भारतभूमीवर जन्म तो झाला.....
खंत  एकच बंधूप्रेमाच्या संस्कृतीत....
का राजकारण जाती पातीचा  आला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनातली खंत .....
काही  जात नाही.....
भाग्यवान  असूनही.....
हाती काही  रहात नाही ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनातील  खंत  जात नाही .....
कसं सांगाव रे तूला.....
झाली असते  भाग्यवंत......
हक्काने  माझी गं म्हटले असते मला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कदाचित  असती....
मी भाग्यवंत .....
नसती का खरच....
मनातली  खंत...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कदाचित  असेल  मी भाग्यवंत ....
ऋणानुबंध  गोड  ते लाभतात....
खंत  एकच मनात भेटीचे....
योग सहज कुठे  घडतात ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कदाचित  असेल  मी भाग्यवंत.....
लक्ष्मी म्हणून  जन्माला  रे येते.....
का जात नाही  खंत  मनातली ......
दोन्ही  घरी परकीच मी का रे रहाते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कदाचित  असेल मी....
खूप  रे भाग्यवंत ....
माझ्या  आपल्यांची वाटे....
नको व्हावी मी कधी खंत ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कदाचित  असेलही  मी भाग्यवंत ....
गोतावळा नात्यांचा लाभलेला.....
खंत एकच  दुनियादारीच्या खेळात....
जिव्हाळा मनातील का बांधलेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                         शाही... ✍️✍️


5 comments:

  1. खुपच सुंदर अप्रतिम रचना.... 👌👌👌✍️✍️✍️🍫🍫

    ReplyDelete
  2. अप्रतिम...खुप खुप सुंदर ...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖💖💖💖💖🌹🌹🌹🌹🌹

    ReplyDelete
  3. फारच छान लिहिलंय 👌👌

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर रचना👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  5. Apratim rachna di khupch sundhar amazing💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...