कदाचित भाग्यवंत मी....
स्त्री जन्म जे लाभले....
खंत हीच भृणहत्येच्या खेळीली...
समाजाने का दूर नाही सारले...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आहेच मी खरंच भाग्यवंत....
भारतभूमीवर जन्म तो झाला.....
खंत एकच बंधूप्रेमाच्या संस्कृतीत....
का राजकारण जाती पातीचा आला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मनातली खंत .....
काही जात नाही.....
भाग्यवान असूनही.....
हाती काही रहात नाही ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मनातील खंत जात नाही .....
कसं सांगाव रे तूला.....
झाली असते भाग्यवंत......
हक्काने माझी गं म्हटले असते मला.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कदाचित असती....
मी भाग्यवंत .....
नसती का खरच....
मनातली खंत...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कदाचित असेल मी भाग्यवंत ....
ऋणानुबंध गोड ते लाभतात....
खंत एकच मनात भेटीचे....
योग सहज कुठे घडतात ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कदाचित असेल मी भाग्यवंत.....
लक्ष्मी म्हणून जन्माला रे येते.....
का जात नाही खंत मनातली ......
दोन्ही घरी परकीच मी का रे रहाते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कदाचित असेल मी....
खूप रे भाग्यवंत ....
माझ्या आपल्यांची वाटे....
नको व्हावी मी कधी खंत ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कदाचित असेलही मी भाग्यवंत ....
गोतावळा नात्यांचा लाभलेला.....
खंत एकच दुनियादारीच्या खेळात....
जिव्हाळा मनातील का बांधलेला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही... ✍️✍️
खुपच सुंदर अप्रतिम रचना.... 👌👌👌✍️✍️✍️🍫🍫
ReplyDeleteअप्रतिम...खुप खुप सुंदर ...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖💖💖💖💖🌹🌹🌹🌹🌹
ReplyDeleteफारच छान लिहिलंय 👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना👌👌👌👌👌👌
ReplyDeleteApratim rachna di khupch sundhar amazing💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍
ReplyDelete