11 December 2021

निष्पाप असं काही मिळावं..

निष्पाप  असे काही  ....
सहज कुठे गवसते....
स्वतः च असावं काही ...
आस ही खुपदा  हरवते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वतःचे मला.....
काहीतरी मिळावे .....
सोपे नाही रे  हे.....
जीवन  सहज जे कळावे...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निष्पाप  मला
रहाता ना ते यावं
सुख वहावं

निष्पाप  मला
बालपण ते आठवे
वाटे ते हवे

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निष्पाप  मनाने सांगुनदे.....
बेईमान कधी रे तु होऊ नको....
प्रेम माझे मिळावे, मला यासाठी .....
उगाच बंधनात या गुदमरू नको...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माझ असं मला....
व्यक्त  होणं  देशील का....
निष्पाप जगणं मिळावं.....
साथ माझी होशील का...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माझं अस आभाळ....
मला रे मीळाव.....
निष्पाप   स्वप्नांच्या रंगांनी....
वाटते मी ते रंगवाव....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वतःच काही  मीळावे......
उगाचच रे वाटले....
निष्पाप  माझे श्वास  ही....
गोड  म गाली हसले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दृष्टिकोन  असा निष्पाप ....
मला रे भेटून गेला....
सारं माझाच होतं म....
प्रश्न  सर्व  मिटवून  गेला .....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                                शाही.... ✍️✍️🍫




3 comments:

  1. अतिशय सुंदर रचना आहेत👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  2. अप्रतिम....खूप सुंदर....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖💖💖💖💖🌹🌹🌹🌹🌹

    ReplyDelete
  3. Khupch sundhar apratim rachna khup khup chan🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰 💞💞💞💞💞💞💞🤗🤗🤗🤗🤗🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...