सौंदर्य म्हणजे काय......
सांगशील का रे कंधी.....
सोबतीने प्रवास सुरू करायचं.....
स्वप्न आहे रे मना मंधी ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शोध सर्व संपतात म्हणे.....
ह्दयात सौंदर्य दिसता ......
सुंदर प्रवास सुरू झाल्यावर......
जप हो खाचखळगे तेव्हाच गं दिसता....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आपुलकीने तुझं ते बोलणं......
संस्कार तूझे मनाच गं सौंदर्य .....
जपुन वाग बर गैर अर्थ होतो.....
नाही इथे मनाच ते औदार्य .....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शोध सारे.......
खरच का संपतात.......
चंचल मनाचे खेळ .......
सोपे नाही कुठे ते कळतात.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
चुकांना माफ करण्यातही......
ह्दयाच सौंदर्य गं दिसत.....
जुनाच प्रवास नव्याने सुरू कर....
नातं बघ गोड कसं हसतं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आई म्हटली की ह्दयाच सौंदर्य .....
शोध तीथे संपून जातात......
मनातील सर्व वादळे......
क्षणात तीच्या जवळ विरून जातात ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
काळजी घे म्हणता म्हणता .....
काळीज गं माझे चोरून नेले......
काळजी घेणारं सुंदर मन पहाता.....
शोध सारे गं संपून गेले.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
विचारात ही रे असतं....
मनाच सौंदर्य लपलेल.....
समजून घेण्याच्या प्रवासात......
नातं जमतं सहज म पुढे नेणं.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शोध संपतो म्हणे.....
ह्दयाचं सौंदर्य दिसता.....
सुंदर प्रवास सुरू करशील.....
सोबतीने माझ्या हसता.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही..... ✍️✍️
No comments:
Post a Comment
Welcome to Shaheen plz. Comments