16 January 2022

चारोळी संग्रह। 16/1/2022

तू माझा झाला ......
हे रे कळले होते .....
सुंदर प्रवासाकडे......
आयुष्य हे वळले होते......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

व्यक्तीसापेक्ष असावी का रे.....
सौंदर्याची व्याख्या.....
सगळ्यांना  दिसले दोषच....
तुझीच का रे लाडकी सख्या.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आचरणात तूझ्या.....
ह्दयाचे सौंदर्य गं  दिसते.....
शोध  सरले सारे ही.....
सुंदर  प्रवासाची नांदी गं भासते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

न भेटता  ऋणानुबंध ....
कसे हे जुळले होते ....
सौंदर्य ह्दयाचे  हे.....
सहज असे कळले होते ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एक सुंदर प्रवास ......
गोड  असा झाला ......
लेखणीने शाही चा......
शब्दगंधा  केला......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दुःख  कुणाचे पाहुन....
डोळे  ते गळणे.....
सौंदर्य  मनाचे हे.....
उशीराच कळले.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शोध  माझा  असा....
आज ग संपला.....
तूझ्या  सुंदर मनाच प्रतिबिंब ....
तुझ्या  डोळ्यात  गं दिसला। .....  

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कळवळ त्याच्या मनात .....
माणुसकी ती जपण्याची.....
सुंदर मनाचा राजा तो....
वेळ  आली मन रे हरण्याची....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दृष्टिकोनावर सारा....
सौंदर्याचा रे खेळ .....
सगळे  बाहेर  शोधत बसले.....
सौंदर्याचा तर मनाशीचना  मेळ.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                               शाही...... ✍️✍️


No comments:

Post a Comment

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...