कर्तव्य पूर्ण करण्यासाठी .....
ध्येयाचा कधी बलिदान जातो.....
असाही संघर्ष जीवनात.....
समर्पण शिकवून जातो ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
ज्यांनी पाहीला संघर्ष तुझा....
त्याला किंमत यशाची तूझ्या.....
बाकी म्हणतील भाग्यवान तु.....
जगरहाटीचा खेळ असा.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
ज्यांनी पाहीला संघर्ष तुझा....
त्याला किंमत यशाची तूझ्या.....
बाकी म्हणतील भाग्यवान तु.....
जगरहाटीचा खेळ असा.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कर्तव्यांनाच ध्येय केल.....
संघर्ष गोड म वाटत गेला.....
माझ्या माणसांच्या चेहर्यावर ....
आनंदात तो दाटत गेला ......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
पानझडीशीवाय झाडाला.....
नविन पालवी कुठे फुटते.....
ध्येयप्राप्तीसाठी संघर्षाशीवाय.....
पर्याय कुठे रे उरते.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
ध्येय तुच रे वेड्या......
शब्दफुलेही ग्वाही देतील.....
संघर्ष ठरलेला सरणापर्यंत.....
श्वासांच कर्तव्य राहील नाव तुझच घेतील....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
संघर्ष तर रोजचाच.....
पण भास तुझा हसला होता.....
असाही कधी कधी तु.....
कर्तव्य म्हणून सोबती दिसला होता ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मन दुखावुन कुणाचं......
ध्येय नको प्राप्त करू.....
संघर्ष गरजेचं रे.....
पण माणूसकी नको लुप्त करू....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तीच्या संघर्षाचं गणीत.....
कुठे मांडता आलं.....
कळलच नाही तिच्यासाठी.....
कर्तव्य आणी ध्येयात काय सरस झालं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
निसर्ग नियमांची.....
उगाच केली पायमल्ली .....
ध्येय ठेऊन वृक्षरोपणाचे.....
कर्तव्य करू पुर्ण होऊन वृक्षवल्ली ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
असतील सोबतीला खूप .....
संघर्ष तुझा तुलाच रे करायचा.....
नको शोधू आधार कुणाचा....
आत्मविश्वास रे हरायचा.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रेमामध्ये का संघर्ष .....
कर्तव्य ती निभावून.....
ध्येय असता मन जपण्याचे.....
हरवतो का गृहीत धरून .....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌💐💐💐
ReplyDeleteछानच रचना 👌🏼👌🏼🌟🌟🌟🌟
ReplyDelete