तुच आहे स गं ताई .....
हसवणारी नी मनवणारी मला.....
सखी म्हणु कि आईच प्रतिरूप ....
काय गं मी म्हणाव तुला.....
माझ्या प्रत्येक स्वप्नाची जाणीव....
मनात जी मी लपवून असते.....
गुपचूप त्याला पुर्णत्व देऊन.....
हळुच माझ्या ओंजळीत तू धरते.....
गजू-पप्पू ची ही जोडी....
मनाने गं सांधलेली....
समजून घ्यावे तु मला.....
हक्काने अपेक्षा लादलेली.....
कधी होशील मावशी मोठी....
सावली तुझी म्हणतं असते....
तुझ्या जपुन घेण्यामुळेच तर....
खोड्या करून मी हसत असते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
खरंय सखी मोठी ताई म्हणजे आईचे प्रतीरुप असते 👌👌👌
ReplyDelete