उगारतील बोट तुझ्यावर...
जमणार नाही म्हणून ....
वारसा तूला संघर्षाचा....
प्रयत्न नको आता थांबून....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तूझ्या आठवांचा पाऊस.....
आला होता भेटीला.....
सांगशील त्याला आता.....
जमणार नाही तस रे भीजायला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
सूर्य तु रे माझाच......
जमणार नाही असं का ते म्हणायचं.....
जाणतो ना उगवग्यासाठी.....
क्षणभर अस्ताला अपरिहार्य ते जाण्याचं.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कधी कधी ऊनसावल्यांच्या खेळात....
नैराश्य ग दाटून येतो ......
जमणार नाही काही वाटत असतांना....
प्रयत्न ही हरून जातो ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जमेल असं वाटतं नाही .....
तीला रे ते समजून घेणं.....
प्रयत्नांना तीच्या असतच की...
नेहमी ते गृहीत धरणं...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
सगळ्यांचे मन जिंकायचे होते....
जमेल असं वाटतं नाही .....
फायद्या तोट्याच्या दुनियादारीत......
प्रयत्नांना ही दिशा मिळत नाही ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मागे फिरणं जमेल.....
असं रे वाटत नाही .....
अनुभवांच होकायंत्र आहेना सोबत....
प्रयत्नांच्या दिशा ही आता रे चुकत नाही ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जमेल असं वाटत नाही ....
तुझ्याशिवाय जगणं.....
प्रयत्न आता प्रत्येक दुआ त.....
असतं तुलाच मागणं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
विश्वासघात करणार्यां बरोबर ....
जमेल अस वाटत नाही ....
प्रयत्नांना दिशा मिळाली तरी....
विश्वास आता पटत नाही ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रयत्नांना दिशा मिळाली नाही तर.....
मार्ग रे बदलावा......
जमणार नाही असं म्हणून .....
प्रश्न का तो टाकावा....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जमेल असं वाटत नाही .....
हा झाला मनाचा खेळ रे.....
प्रयत्नांना दिशा तुला रे द्यायची .....
मिळत नाही दिशा म्हणण्याची नको वेळ रे....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
भेट आपली जमेल......
अस नाही रे वाटत.....
प्रयत्नांना दिशा ....
नाही रे सापडत...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
अतिशय सुंदर शब्दशैली👌👌👌👌👌👌
ReplyDeleteसर्व रचना छानच आहेत 👌👌👌👌👌🌟🌟🌟🌟
ReplyDelete