विसरून जात जा गं....
झालं गेलेलं......
क्लेश मनी ठेऊन ....
भलं कुणाचं का झालेलं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
झाल गेलं सोडून देऊ......
चुकलं कुठे कळायला हवं.....
क्लेश देऊन एकमेकांना ......
नको रे आता छळायला हवं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
सर्वच प्रश्नांची उत्तरे ......
सोडवून कुठे सुटतात....
कधीकधी सोडुन देण्यात.....
हित नात्यांचे घडतात....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नविन वर्षाची.....
भेट मला देशील का....
झाल गेलं विसरून....
माझा तु होशील का....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
एकदा संवादातून .....
गैरसमज दूर केलेले....
झाले गेलेले असे....
कितीदा सोडून दिलेले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
झाले गेले सारे .....
मी कुठे रे जपलेले.....
क्लेश होऊन आहे का.....
मनात तूझ्या लपलेले.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
क्लेश कुठे धरले.....
सोडले की क्षणात.....
सारे माझे म्हणता....
चुक आली ध्यानात ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
झाले गेले सारे .....
सोडून द्यायचे रे होते.....
ईतके तरी तू.....
समजून घ्यायचे ना होते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मी आहे गं वेडू....
शब्द तुझे कानी पडतात....
क्लेश सारे असे....
क्षणात रे गळतात.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही... ✍️✍️
अप्रतिम रचना👌👌👌👌👌👌
ReplyDelete