22 January 2022

क्षण... 22/1/2022

सुखाचा क्षण महत्वाचा.....
सांगण्यास दुःख  येते.....
लपवले किती  तरीही.....
पाऊलखुणा सोडून  जाते ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आयुष्य  सरले......
सुखाच्या क्षणामागे......
पण सुख सोडून  गेले ......
नेहमी दुःखाचे धागे......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उमजलच  नाही गुंतण कुणात.....
काय हे वेड्या  मनाला...
आला विरह तर समजल.....
मरण यातना क्षणा-  क्षणा  ला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जान बरी ना तु ....
मँसेज  तुझा रे येतो.....
क्षण हा आनंदाचा ....
दुःखाला माझ्या  हसवुन जातो...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आनंदाचा एक  क्षण.....
असा ही मांडला.....
मनात लपवलेल्या दुःखाला.....
कागदावर जेव्हा  सांडला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कसा करू ना भेद.....
सुख दुःखाच्या  क्षणात....
लपला तु ही ना.....
या क्षणांच्या मनात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हसणार्या चेहर्‍यामागे......
जास्त  दुःख  लपलेले असते......
असे दुहेरी  जगणे......
तीलाच जमलेले असते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काळजात लपवलेले दुःख .....
नजरेने तु वेचून घेतले......
शब्द ही माझे कसे ना.....
तुच रे समजून घेतले.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दुःख  ते आभाळाएवढे......
कसे जमते लपवायला.....
राहणीमानात पडसाद नसतात.....
अभिनय तुझे हवे रे मानायला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही.... ✍️✍️


1 comment:

  1. अतिशय सुंदर लिहिल...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖💖💖💖🌹🌹🌹🌹🌹🌹🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...