सुखाचा क्षण महत्वाचा.....
सांगण्यास दुःख येते.....
लपवले किती तरीही.....
पाऊलखुणा सोडून जाते ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आयुष्य सरले......
सुखाच्या क्षणामागे......
पण सुख सोडून गेले ......
नेहमी दुःखाचे धागे......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उमजलच नाही गुंतण कुणात.....
काय हे वेड्या मनाला...
आला विरह तर समजल.....
मरण यातना क्षणा- क्षणा ला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जान बरी ना तु ....
मँसेज तुझा रे येतो.....
क्षण हा आनंदाचा ....
दुःखाला माझ्या हसवुन जातो...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आनंदाचा एक क्षण.....
असा ही मांडला.....
मनात लपवलेल्या दुःखाला.....
कागदावर जेव्हा सांडला.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कसा करू ना भेद.....
सुख दुःखाच्या क्षणात....
लपला तु ही ना.....
या क्षणांच्या मनात....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
हसणार्या चेहर्यामागे......
जास्त दुःख लपलेले असते......
असे दुहेरी जगणे......
तीलाच जमलेले असते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
काळजात लपवलेले दुःख .....
नजरेने तु वेचून घेतले......
शब्द ही माझे कसे ना.....
तुच रे समजून घेतले.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दुःख ते आभाळाएवढे......
कसे जमते लपवायला.....
राहणीमानात पडसाद नसतात.....
अभिनय तुझे हवे रे मानायला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
अतिशय सुंदर लिहिल...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖💖💖💖🌹🌹🌹🌹🌹🌹🍫🍫🍫🍫🍫
ReplyDelete