तुझ ते खळखळून हसणं......
दुःख लपवण्याचं असतं ना गं मनात.....
जगण्याचं तुझ हे गुपीत वेडू....
आल गं माझ्या ध्यानात .....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दुनियादारीच्या खेळात.....
व्यवहार खूप रे छळले....
सुख विकत घेणारा आणि ....
दुःख विकणारा कोण नाही रे कळले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कसं गं जमत तुला....
ते लाघवी हसणं.....
दुःख सारे लपवुन ....
स्वतःला फसवणं.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आनंदाचा एकमात्र क्षण....
शोधायचं रे ठरल....
तूझ्या सोबतच्या क्षणांनी....
मिठीत अलगद म भरलं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
लपवलेले दुःख बघ ना...
कसे फितूर झाले...
पहातच तुला ते.....
डोळ्यातुन गळुन गेले ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आयुष्याच गणीत....
सोपं होत सोडवायला...
क्षणिक सुखाच्या ओढीने.....
घोळ सारा रे केला.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आनंदाचा क्षण.....
शोधता रे कळले.....
आपल्या माणसांच्या सोबतीत....
होते ते सर्व भरले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शोधावा लागलाच नाही....
आनंदाचा गं क्षण.....
आईच्या सहवासात....
आनंदाने भरलेले राही मन...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दुःख सारे म्हटलं.....
लपवून पहावे.....
अनुभव ते सारे....
हरवुन नको जावे....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
पडाव आनंदाच उन.....
मनाच्या रे अंगणात.....
लपवलेले दुःख....
नको रहावे स्मरणात....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शोधून कुठे ....
आनंदाचा क्षण सापडतो.....
उगाच दुःखाला लपवण्याचा....
खेळ असा चालतो.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आनंदाचा एक क्षण....
सोबतीने तूझ्या तु नेला....
दुःख लपवण्याचा प्रश्न .....
असा ऐरणीवर आला.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
माझ्या सर्व दुःखाना......
तुझ्या भेटीच्या क्षणाची ओढ रहायची....
आता नाही ते शक्य म्हणता.....
आठवण गोड ती यायची....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
परीस कसा रे तु.....
शोधूनही हरवला....
तसाच आनंदाचा क्षण....
शोधून ही तू दवडला.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुला कधीच लागु नये.....
आनंदाचा क्षण शोधावा.....
खर्या मनाने तुझ्यासाठी.....
प्रार्थनेत असेल हा धावा.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शोधून आनंदाचा क्षण सापडेना.....
दुनियादारी ही रे कळली.....
तेव्हा दुःखाची म....
समाधानाशी भेट घडली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही..... ✍️✍️
अप्रतिम...खुप खुप सुंदर लिहिल शाही...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🍫🍫🍫🍫🍫🌹🌹🌹🌹🌹🌹💖💖💖💖💖
ReplyDelete