04 January 2022

दुजोरा.... 4/1/2022

कसा मी दुजोरा देऊ .....
वेड्या रे या दुनियादारीला.....
तु माझा नाही  होणार......
सांगता ते येऊन क्षण क्षणाला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दुजोरा  दिला  त्याने.....
आज हळू येऊन.....
जाईल गं म्हणे स्वतःला .....
तुझ्याकडे ठेऊन.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूझी काळजी मी.....
स्वतः कडे ठेऊ का....
दुजोरा  देशील.....
हक्क असा घेऊ  का....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कसा देऊ ना दुजोरा  या वेड्या मनाला .....
स्वतः कडे तुला जपायचे म्हणतो....
तु तर नभातला चंद्र .....
हा वेडा तुझ्यातच रे रमायच  म्हणतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

 ठेऊ तो क्षण स्वतःकडे.....
जो तूझा माझा होता.....
दुजोरा  नाही  दिला त्यानेही.....
तूझ्याशीवाय तो ही भांडला होता...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काय ठेऊ  स्वतःसाठी.....
आपल्यात रमण्याची मला रे खोड.....
कसा ना  देऊ दुजोरा मनाला.....
त्याला लागली एकांताची रे ओढ.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सोडून  जायचं तू......
आणी मी दुजोरा देऊ......
स्वतः कडे सांगशील......
श्वास  गेल्यावर मी काय ठेऊ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कसा पाठिंबा  द्यावा बर.....
चुकीच्या  त्या वागण्याला....
धुम्रपान  करतो तो......
अर्थ  नाही  अशा जगण्याला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

त्याचा आनंद  कशात.....
कळत नाही  बोलून गेला....
दुजोरा  कसा न देऊ.....
जीव असा तो जाळून गेला ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माझ्या  प्रत्येक  कामात .....
दुजोरा  तुझा हवा.....
कळला नाही  हा, कायदा....
माझ्यासाठी का हवा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                              शाही... ✍️✍️


3 comments:

  1. खूप छान चारोळ्या...👍👌✍️🍫

    ReplyDelete
  2. अप्रतिम रचना👌👌👌👌👌

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर....अप्रतिम...शाही....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖💖💖💖🍫🍫🍫🍫🍫🌹🌹🌹🌹🌹

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...