कसा मी दुजोरा देऊ .....
वेड्या रे या दुनियादारीला.....
तु माझा नाही होणार......
सांगता ते येऊन क्षण क्षणाला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दुजोरा दिला त्याने.....
आज हळू येऊन.....
जाईल गं म्हणे स्वतःला .....
तुझ्याकडे ठेऊन.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तूझी काळजी मी.....
स्वतः कडे ठेऊ का....
दुजोरा देशील.....
हक्क असा घेऊ का....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कसा देऊ ना दुजोरा या वेड्या मनाला .....
स्वतः कडे तुला जपायचे म्हणतो....
तु तर नभातला चंद्र .....
हा वेडा तुझ्यातच रे रमायच म्हणतो....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
ठेऊ तो क्षण स्वतःकडे.....
जो तूझा माझा होता.....
दुजोरा नाही दिला त्यानेही.....
तूझ्याशीवाय तो ही भांडला होता...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
काय ठेऊ स्वतःसाठी.....
आपल्यात रमण्याची मला रे खोड.....
कसा ना देऊ दुजोरा मनाला.....
त्याला लागली एकांताची रे ओढ.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
सोडून जायचं तू......
आणी मी दुजोरा देऊ......
स्वतः कडे सांगशील......
श्वास गेल्यावर मी काय ठेऊ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कसा पाठिंबा द्यावा बर.....
चुकीच्या त्या वागण्याला....
धुम्रपान करतो तो......
अर्थ नाही अशा जगण्याला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
त्याचा आनंद कशात.....
कळत नाही बोलून गेला....
दुजोरा कसा न देऊ.....
जीव असा तो जाळून गेला ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
माझ्या प्रत्येक कामात .....
दुजोरा तुझा हवा.....
कळला नाही हा, कायदा....
माझ्यासाठी का हवा....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही... ✍️✍️
खूप छान चारोळ्या...👍👌✍️🍫
ReplyDeleteअप्रतिम रचना👌👌👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर....अप्रतिम...शाही....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖💖💖💖🍫🍫🍫🍫🍫🌹🌹🌹🌹🌹
ReplyDelete