08 January 2022

मनावरचे वळ... 8/1/2022

उपेक्षांनी  खुपदा......
एकटं तीला पाडली.....
मनावरच्या वळांना बळ करून.....
सिंधुताई माझी घडली .....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उपेक्षा  की प्रेम  तुझं....
कळत नाही  कंधी.....
ह्दयात ठेवशील की....
जपशील मना मंधी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उपेक्षांनी त्या..
एकटे ते पाडले......
हक्क गृहीत धरण्याचे देऊन ....
का गं स्वतःला  जाळले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ्या  माझ्या नात्यांत.......
नाही द्यायची उपेक्षेला जागा.......
जगरहाटीच्या या खेळाला ही.......
गुंतवू बांधून  प्रेमाचा धागा......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उपेक्षा  देतो तु....
हरकत नाही  त्याची.....
खोट प्रेम  नको हो करू.....
शिक्षा, ही नाही सहन व्हायची......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उपेक्षा  करते रे.....
नेहमी तूझ्या दोषांची......
जाणवता त्या सल मनाला.....
प्रेम माझं का आटल्याची.....
 
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कारे करतो उपेक्षा.....
एकटी असे पाडुन.....
मनात आहे रे स्वप्न .....
किती रे देऊ गाळून......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जाणतोना उपेक्षाच......
पदरी त्या पडलेल्या.....
तु समाजशील अपेक्षेत.....
वळ होऊन मनावर उठलेल्या.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आपल्यांच्या अपेक्षांनी.....
उपेक्षित करून एकटे गं पाडले....
मनावर उठले वळ......
सल होऊन  नेहमी  छळले.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कुंपणच रे शेत खातं .....
वळ मनावर रहातील....
उपेक्षांशी कस लढु......
जिंकूनही नातीच रे हरतील......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आर्थिक  विवंचना  ही.....
उपेक्षित करून एकटं रे पाडते.....
मनावर उठतात वळ.....
नात्यातले एकटेपण असेही जाळते....
....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनाचे वळ गं.....
बळ आता केलेले.....
उपेक्षांनी एकटे पाडून....
जगणे आता कळलेले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्त्री  म्हणून  उपेक्षांशी....
नात गं माझ जोडलेलं.....
मनावर वळ घेऊन  ही.....
लढणं कुठे मी सोडलेल.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                               शाही.... ✍️✍️


1 comment:

  1. Khupch sundhar apratim rachna di khup khup chan👌👌👌👌👌👌👌👌 ✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻🌟🌟🌟🌟🌟🌟💐💐💐💐💐👌🍫🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...