भौतिक सुख हीच प्रगती ......
हे खुळ होत जेव्हा रूळल.....
माणूस माणूस राहीला नाही .....
पहाता मन होतं हळहळलं.....
स्वतःला काय वाटतं ......
ते कसे तो सांगेल.....
वेळ इतका कुठे त्याकडे......
आत आपल्या तो झाकेल.....
माणूसकी कशी जपावी......
प्रश्न मनाला पडला होता ......
पायाखाली फुल तुडवता......
पायी सुगंध देत फुल हसला होता .....
माणूसकी जपण्याच गोड गुपीत ....
क्षणात असं ते कळलेल......
आनंदी होण्यासाठी पुसावं......
वेदनेने डोळे गळलेलं......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
Khupch sundhar lihale di khup khup chan👌👌👌👌👌👌👌 ✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻🌟🌟🌟🌟🌟💐💐💐💐💐
ReplyDelete