रोजच्या वादांना कंटाळून त्याने निर्णय घेतलाच विभक्त होण्याचा. तीला तर मुलांना एकत्र कुटुंबात वाढवायच होतं. जाणत होती ती आजी बाबा आणि नातवांमधला लळा. पण चुक कुठे होत होती हेच उमजत नव्हतं. सासूबाईंच्या मनातली वादळ ही तीला कळालं, पण काय तडजोड करावी कस थांबवावे हे जाण उमजत नव्हतं. निघायची वेळ जवळ आली. निघायच्या आधी सासूबाईंचा आशिर्वाद घेतला. आणि डबडबलेल्या डोळ्यांनी त्यांचा हात हातात घेत म्हटली, "कुठे चुकत होते आई सांगाल का मला, म्हणजे ती चुक मी माझ्या सुनेला आणि मुलीला नाही करू देणार. ". एक स्त्री म्हणून सुनेला समजून घेण्यासाठी मी हवी ती तडजोड करेल. स्त्री म्हणजे तडजोडच ना आणि तडजोड म्हणजे जोडतोड. सांगना आई ! कुठे कमी पडते मी हे सावरायला. आई आहात ना!करा ना मदत माझा विखुरणारा परीवार आवरायला. चालना करू ना तडजोड आपल्या परिवाराला प्रेमात एकत्र बांधून ठेवण्यासाठी. एक स्त्री म्हणून माझ्या वेदनांना तूम्ही समजू शकतात. कराल ना मदत परिवाराला एकत्र बांधून ठेवण्यासाठी. हवी ती तडजोड करू या आपण एकत्र रहाण्यासाठी...... तडजोड अहंकार आणि गैरसमज यांना दूर सारून नात्यांना समजण्याची केलेली सुरूवात........
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही... ✍️✍️
अप्रतिम लिहिल शाही....👌👌👌👌👌💖💖💖💖💖🌹🌹🌹🌹🌹🍫🍫🍫🍫🍫
ReplyDelete👌👌👌
ReplyDeleteKhupch apratim lihale khup sundhar🤗🤗🤗🤗🤗🤗🤗 ✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻🌟🌟🌟🌟💐💐💐💐💐💐
ReplyDelete