12 February 2022

तो गुलाब .....13/2/2022

काट्याविन गुलाबाचा......
कोमलपणा व्यर्थ ना रे...
जीवनात सुख दूःखाला....
सोबतीने अर्थ ना रे...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गुण दोषांसकट.....
याव एकमेका जपता....
काट्यावरील गुलाबाला म्हणून....
प्रेमाच प्रतीक ना म्हणता....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आजही तो  जुना गुलाब....
आहे रे वहीत जपून.....
तुला माझा म्हणतांना....
द्यायचा होता लपून....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नोट्स म्हणता कसा ना तू.....
गुलाब लपवून दिला होता.....
तूझा तो खोडकरपणा.....
मनाला आवडून गेला होता.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जुना तो गुलाब.....
सुगंध आपला जपून आहे.....
खरच का आजही मी.....
मनात तुझ्या लपून आहे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कुस्करणार्यालाही सुगंध द्यावा.....
जुना गूलाब तो सांगून गेला....
त्यागातच खर प्रेम.....
जणण्यातून रे मांडून गेला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कुस्करणार्यालाही सुगंध द्यावा.....
जुना गूलाब तो सांगून गेला....
त्यागातच खर प्रेम.....
जणण्यातून रे मांडून गेला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ माझं नात......
आहे भावनांशी जुळलेल....
जुन गुलाब जपतांना....
तुला ही ना कळलं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुला पहाता तो गुलाब....
होता गं स्वतःवर रुसला.....
तो सुंदर असल्याचा भ्रम....
होता गं त्याचा फसला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जाणते प्रेमाला असतो......
विरहाचा रे शाप ना.....
तरी जपून ठेवलाय.....
तो जूना गुलाब ना......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काट्यांनसोबत राहूनही.....
कसा ना गोड असतो.....
त्या जुन्या गुलाबात......
आज ही भास तुझाच गं हसतो.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सांगावा तूझ्या  अबोल प्रेमाचा....
ज्याने तो दिला होता....
हो तो जूना गुलाब....
मी जपून आजही ठेवला होता....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तू दिलेला गुलाब....
आजही वहीत लपलेला.....
आपल्या प्रत्येक पाकळीत....
असंख्य आठवणी जपलेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तो जूना गुलाब.....
तु ही का जपलेला.....
आठवतं देतांना तो....
किती होता न घाबरलेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गुलाब गं म्हणे तो.....
प्रेमाच  आहे ना प्रतीक....
काटे विरहाचे येतील....
परीक्षा प्रेमाची घेतील....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खुप गुलाब दिलेस तू.....
त्या गुलाबा नंतर....
जुना झाला तरीही नाही....
दिले मी त्याला अंतर...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तो जूना गूलाब.....
आस मनाला देऊन जातो......
तुही जपल असेल मनात.....
भास गोड ठेऊन जातो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                        शाही.....✍️✍️


2 comments:

  1. अप्रतिम....खुप खुप सुंदर शाही....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🌹🌹💖💖💖💖💖🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...