13 February 2022

प्रेम.. 13/2/2022

प्रेम म्हणजे काय.....
होता गं पुसून गेला.....
ह्दयाची स्पंदन दाखवता.....
मिठीत घेता हसून गेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ती वेळ  छान  होती....
मनात खुप काही  घडत होतं ...
प्रेमात आपण एकमेकांच्या...
हळूहळू  कळत होतं...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आई तूझ्या  सोबतीतच.....
प्रेमाचा खरा अर्थ  आहे....
अपेक्षा  आणी गैरसमजूतींनी.....
नाते  होतात का ग व्यर्थ  आहे .....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


आहे का रे मी....
आजही तूझ्या ध्यानात....
पहिल प्रेम म्हणता.....
आजही तूच मनात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁




शब्दात कुठे रे.....
सगळ ते सांगता आल.....
प्रेम होत तूझ्यावर पण....
हक्क कुठे रे मागता आलं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁



आहे तशीच त्याने स्वीकारली....
हीच माझ्या प्रेमाची खासीयत....
म्हणूनच त्याच्या नावे......
माझ्या ह्दयाची ग वसीहत.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


प्रेम म्हणू की फरीश्ता म्हणू तूला....
कळत नाही रे कंधी....
गोड संवेदना जागवली प्रेमाची....
तुच रे राजा लपला या मनामंधी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


ठरवून कुठे रे......
प्रेम ते केल जातं.....
चोरपावलांनी कुणी येऊन....
आजन्म मनात राहुन जातं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


पहिलं प्रेम...दुसर प्रेम.....
असं खरच रे नसतं....
गोड अशी ती रे भावना.....
व्यवहाराच्या क्रमवारीत बसत ते नसतं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


साधारण होते मी....
खास तु बनवून गेला....
तु ते पहिल प्रेम.....
विसरणं न झाल तुला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माझ्या शब्दफलांची साद......
खरच तुझ्या मनाला भीडते.....
तुच माझ पहिल प्रेम....
कुठे रे तुला कळते...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माझ्या शब्दफूलांची साद......
खरच तुझ्या मनाला भीडते.....
तुच माझ पहिल प्रेम....
कुठे रे तुला कळते...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कितीदा नव्याने पडते......
पहिल्या प्रेमाच्या प्रेमात.....
अव्यक्त असला तरी.....
राज्य त्याचच आजही मनात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पहिल प्रेम म्हणता.....
का रे तु आठवाव......
का कुणाला मनाने.....
आपलं म्हणता साठवाव....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पहिल प्रेम म्हणून.....
जपलय तुला ध्यानात.....
नव्हत जे नशीबात....
तेच राहील मनात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माझ पहिल प्रेम.....
आहेस रे राजा तू.......
जगण नाही तुझ्याशिवाय.....
जाणतो ना हे तू.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                         शाही....✍️✍️


No comments:

Post a Comment

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...