हेच असाव का पहिले प्रेम
पहा तुम्हा ही पटत का....!!
पहाता त्या अनोळखीला
वाढणारी ह्दयाची धडधड का?
वळून त्याला पहाण्यासाठी
बंधनातील मनाची होणारी
ती जीवघेणी तळमळ का....!!
दिसावा दारावरून जातांना
म्हणुन दार आणी खीडकीत
लपून ते पहाता पहाता
क्षण क्षण झुरण का.....!!
त्याला आवडत असेल
म्हणून न आवडतही
जपून ते धरण का.....!!
अव्यक्त राहूनही
सुख त्याच मागण का...!!
भेटणार नाही कधीच तरीही
क्षण क्षण त्यासाठी
जीवघेण तात्काळण का...!!
त्याला आठवता येणार
खोडकर हसू का.....!!
मनामध्ये कल्पनेत रमून
होणारा तो गोड संवाद का....!!
त्याच्या आनंदात चेहर्यावर
येणार निस्वार्थ हसू का...!!
दुःखात त्याला पहाता
गळणारा अबोल तो आसू का...!!
सुख दुःखाच्या हिंदोळ्यावर
हवा हवासा वाटणारा
भावनांचा गोड खेळ का....!!!
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही ✍️✍️
No comments:
Post a Comment
Welcome to Shaheen plz. Comments