नेहमी एकत्र रहाण्याचे वचन.....
अलीखीतच असते मैत्रीत.....
अपेक्षा नसतात ग या नात्यात......
नेहमी म्हणून गणतात खात्रीत....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
एकत्र राहण्याचे वचन देतांना....
एकच रे सांगायचे होते.....
सुख.माझे तूझ्या ओंजळी धरतांना...
दूःख तूझे सारे पदरी मागायचे होते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मनात जपू गं एकमेकांना.....
एकत्र रहाण्याचे वचन नीभवण्यासाठी....
सांग ना या जगाला...
नका न लागू आमच्या पाठी.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
एकत्र राहण्याच्या वचनाने......
खरच नाती बांधली का जातात....
सप्तपदीची सर्व वचने......
घटस्फोटात का दबली जातात....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
वचन आणी भेट नसली तरीही
नेहमीच एकत्र असतात
माझ्या लीपी परीवारातील
ऋणानुबंध कसे ना हसतात
येणार्या प्रत्येक वादळाला
प्रार्थना तुमच्या पळवून लावतात
किती मोठा आधार तुमचा
मांडाया शब्द ही थीटे पडतात
आपल्या माणसांना कधी
धन्यवाद नसतं ना म्हणायच
ऋणात नेहमीआहे मी तुमच्या
शब्दातून होत हो सांगायचं
खुप खुप धन्यवाद लीपी परीवारातील सगळ्यांनाचा.अमूल्य प्रार्थनांनी नेहमीच आपण मला साथ दिलात.नेहमीच ही साथ अशीच राहील ही अपेक्षा.काळजी घ्या आणी स्वस्थ रहा.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
एकत्र रहाण्याच वचन.....
शब्दांना रे मागीतलं......
चारोळ्यात बसतांना.....
त्यांनी ही होकार म सांगीतलं...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
त्या डोळ्यांसारखा शाप.....
आला ना रे आपल्याला.....
नेहमी एकत्र राहण्याचे वचन पाळले....
पण विरहाचा कधी न रे तो अंत झाला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
एकत्र राहण्याच वचन.....
उगाच श्वासांकडून मागत बसले.....
ते ही सख्यासारखे होते....
वेडू म्हणून खुदकन हसले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.....✍️✍️
व्वा व्वा सुंदर.
ReplyDelete