आवडेल मला शेवटचा श्वास....
मिठीत तुझ्या रे घ्यायला....
तू सुखी रहावा हीच सदीच्छा असेल....
तेव्हा ही रे द्यायला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शेवटची भेट माझी.....
घेशील का तु अशी....
तु मी आणी....
सोबतीला नभातला शशी....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
येऊन भेट ना त्या वळणावर....
सोडून जीथे तू होता गेला.....
तुझीच आहे रे आजही मी....
वचन सर्व तु का विसरून गेला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नाहीरे आठवावी वाटत.....
नातेवाईकांनी दिलेली ती शेवटची भेट....
परीस्थीती बदलता....
अबोला देऊन अपरीचीत झाले थेट...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कुठली भेट शेवटची....
आयुष्यात कस सांगायच.....
प्रत्येक भेटीला आनंदाने.....
का नाही मनसोक्त जगायच....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शेवटच्या त्या भेटीचा....
मनात होता कालवा....
डोळ्यातला पाऊसही....
होतो रे म हळवा...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
का रे पाणवतात डोळे तूझे....
प्रत्येक आपल्या भेटीवर.....
जीव ओवाळून टाकते रे....
निरपेक्ष तुझ्या या प्रितीवर.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
येईल गं स्वप्नात.....
भेट तूझी घ्यायला.....
राहीलेली मिठी.....
घट्ट अशी द्यायला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
भेट ती शेवटची......
का म्हणून गेलास तू......
डोळ्यातील किनार्यांचा साकव.....
सहज मोडून गेलास तू....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नाही रडायच ठरल होत ना....
शेवटच्या त्या भेटीत.....
अश्रृंनीच घेतले पण.....
कसे एकमेकांना मिठीत.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कुठल्याही भेटीला.....
शेवट हा शब्द लागू नये....
नियतीने अपरीहार्य केल्याशीवाय....
नातं कुठलही टाकू नये....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.....✍️✍️
No comments:
Post a Comment
Welcome to Shaheen plz. Comments