06 February 2022

चारोळी संग्रह....6/2/2022

मनातील भावनांचा.....
नाही रे तूला किनारा केला....
जरी तू भेट शेवटची....
होता ना देऊन गेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ऐकना!.....
एकदा भेटायच आहे रे तुला....
पहीली की शेवटची भेट.....
निर्णयाचा हक्क दिलाय रे तुला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आठवते अजूनही.....
ती शेवटची भेट.....
अबोला तुझा काळजात.....
भीडला होता थेट...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अब्बांची आणी ताईची भेट......
शेवटची ती घडलीच नाही.....
संसार करण्यासाठी माहेर दुरावण्याची.....
रीत आजही कळली नाही....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कोरोना मुळे किती भेटी.....
शेवटच्या त्या ठरून गेल्या....
किती हात हरवले.....
आठवणी त्या उरून गेल्या....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शेवटची भेट.....
  शाळेची आणी माझी.....
बालपण तीथे हरवल्याची पाऊलखूण....
आहे रे आजही ताजी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ती शेवटची भेट.....
आठवते का तुला....
येईल मी लव कर.....
म्हटला होता मला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ती भेट शेवटची......
आस ठेऊन गेलेली.....
भेटू कधीतरी म्हणता......
जगण्याच ध्येय होऊन गेलेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ती शेवटची भेट......
आणी वळून तुझ पहाण.....
कळल होत मला तूझ.....
अस माझ्यात राहणं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ती शेवटची भेट.....
आणी काळजी घे म्हणण.....
कस बर विसराव.....
त्या क्षणात थांबल जगण.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                   शाही.......✍️✍️


1 comment:

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...