30 March 2022

आई....

आई तुझ  स्मीतहस्य ....
जगण्याच माझ बळ....
अश्रु  ही माझे मला....
नाही ग म होत  जड...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझी प्रेमाची भाषा आई.....
असते ग निःशब्द.....
त्याग हा प्रेमाचा पाया.....
हे मौनातून तुच ग बोलते फक्त......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुच तर आहे  आई......
वादळे माझी शमवुन  हसवणारी......
करशील तु अवघड नाही  तुझ्यासाठी.....
म्हणता स्वप्नांना गं जागवणारी......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वतः ओल्या अंथरूणावर झोपून....
बाळाला कोरड्या जागेवर झोपवते....
किती त्याग गणावे आईचे....
त्यागमुर्ती ती ग म्हणवते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बाळ गर्भात रहाता....
त्याग आईचा सुरु होतो......
हे नको ग खाऊ,असच चाल म्हणता.....
बाळासाठी जगण सुरु होतो.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बर झालं  ग आई।....  
तुझी साथ  असते....
चिंता ही मला म....
गाली हसतांना दिसते...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

किती त्याग नि परीश्रम. आई बाबांचे...
लेकरांनी यशस्वी व्हाव म्हणून.....
आभाळ गवसता लेकरांनी....
योग्य का त्यांना जाव सोडून.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हरवल्यावर आई बाबा....
त्याग त्यांचे कळतात....
दुर्भाग्य  कधी कधी....
असेही ना छळतात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सावली देता देता पानगळीत....
पान  ती गळून गेली.....
पहाता हे त्यागाची तूझ्या आई....
महती ग जाणवून गेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही.....✍️✍️


2 comments:

  1. Khupch bhavnik rachna keli di🥺🥺🥺🥺 khup khup khup chan apratim shabd rachna.... 👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌻🌻🌻🌻🌻🌻🌻💐💐💐💐💐🌸🌸🌸🌸🌸🌸🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...