16 May 2022

दोष कुणाचा??...चारोळी संग्रह

तीच्यात दोष त्याला.....
आता सारखे दिसतात....
सोडून जाण्याचे खेळ.त्याचे...
त्या वेडीला कुठे कळतात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कुणाच्या दोषाची चर्चा....
नको रे जनात.....
समजून घे सगळ्यांना....
जप हे मनात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पोटापाण्यासाठीच तो.....
घराला ही होतो पारखा....
दोष यात कुणाचा.....
प्रश्न पडतो रे सारखा...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तू समोर येता......
शब्द ते गोठतात.....
सांगना दोष कुणाचे.....
तूला यात वाटतात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दुनियादारी तुला कळत नाही....
दोष तीला हा दिला गेला....
गर्भात का कळी खुडली जावी.....
प्रश्न तीने  फक्त इतका होता केला ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अंगभर कपडे घालत नाही.....
दोष तीचा हाच सांगीतला गेला.....
पाळण्यात भेटली निर्भया जेव्हा जेव्हा....
मुद्दा हा सहज कसा टाळला गेला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वैधव्य येण......
खरच दोष तीचा......
कराल का कधी विचार.....
तीने काय गमवलं याचा......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दोष तूझा दिसता....
चुक माझी कळते....
तूझ्यावर प्रेम करायला .....
कमी मीच रे पडते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बळीराजा माझा.....
घाम गाळून उपाशी.....
दोष कुणाचा आहे का उत्तर....
सांगा बर कुणापाशी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

.                     शाही.✍️✍️.....

.

No comments:

Post a Comment

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...