दोष कुणाचा यावर....
नको वाद वाढायला.....
खुप सोप कारण हे बर....
खरा मुद्दा टाळायला.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
माफ करून द्याव....
सगळ्यांना आपल म्हणता...
का बसाव बर....
दोष कुणाचा गणता....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कायदयांना पळवाटा....
आपण त्या शोधायच्या बर....
सुव्यवस्था नांदत नाही म्हणता....
दोष कुणा द्यायचा खर...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
पुरुष म्हणता संस्कार करता....
वेगळी त्याला ग जाणीव....
अवहेलना होता स्त्री ची....
दोष कुणाचा शोधावी का ग उणीव....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मनुष्य रे मीश्रण.....
गुण आणी दोषाचा.....
कसा करावा रोष.....
सांग मग कुणाचा....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
चालतांना लागली ठेच....
दोष हा कुणाचा....
दगडाचा की पायाचा की....
तूझ्यात गुंतलेल्या मनाचा...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दरवाजा घट्ट झाला म्हणता....
पावसाचा का ग दोष.....
भीजलेल्या आठवणी मनाच्या उंबरात....
अडकल्या हा त्याचा ना रोष...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दोष कुणाचा.....
कस बर सांगाव.....
कुंपणच शेत खातय.....
सहज कुणी मानाव...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नात्यांची सुंदरता.....
दोष एकमेकांचे रे स्विकारण्यात.....
दोष कुणाचा म्हणत....
नाते नाही नाकारण्यात....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दोष कुणाचा.....
मानव प्रवृत्तीचाच असावा....
आवडता सगळ गोड ते दिसाव....
न आवडता होताच दोष आणी दोषच असाव....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
स्वप्न माझी तर...
प्रयत्न ही माझे असावे....
का बर दोष.....
कुणा दुसर्याला द्यावे....
🌞
नाही रे वेड्या मना....
दोष तूझा नाही....
नशिबात जे नसत...
तेच फार मला आवडून जायी.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
खुप सोप ना....
दोष कुणाचा?शोधण....
किती बोट आपल्याकडे वळली...
सहज नाही ना मोजण....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नेहमी दोष ती.....
नशीबावर लोटते....
आपल्या भावनांचा....
असाही गळा घोटते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
चुक कुणाचीही असूदे.....
परीस्थीतीला दोष देऊ....
राजा आपल नात आपण....
अस नेहमी जपून घेऊ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही..✍️✍️..
No comments:
Post a Comment
Welcome to Shaheen plz. Comments