अपेक्षा...!अपेक्षा...!!अषेक्षा....!!!
अपेक्षा म्हणजे काय,तर माझ्या मनाला हवी तशीच कृती इतरांनी करावी हेच ना!!किती सहज अपेक्षा करतांना आपण स्वतःला महत्व दिलेल.अपेक्षा ही इतरांकडून असते तशी स्वतः कडूनही असतेच. आणी ती सकारात्मक असतेच असे नाही ती नकारात्मकही असू शकते.
तारुण्याच्या उंबरठ्यावर तरूणीच्या अपेक्षा आपल्या स़्वप्नातल्या राजकुमारा कडून.शीक्षण संपता तरूणाच्या आपल्या नोकरी आणी व्यवसायातल्या अपेक्षा.मुलांगी मार्गी लागाव आई बाबांच्या अपेक्षा.मुलीला कलागुणांसहीत जपून नेणार्या सासर ची अपेक्षा,सुनेने घरात मीसळून जाण्याची जणू दूधात साखर होण्याची अपेक्षा.
जीतकी नात्यांची रूपे तीतक्याच अपेक्षा आणी तीतकच अपेक्षाभंगाच दुःखही.
अपेक्षा करणे चुकीच नाहीच,पण ती पुर्ण नाही झाली तर वास्तव स्विकारण्याची प्रगल्भता असणे यातच माणसाची खरी परीपक्कता दिसते.अपेक्षांची घागर बुडल्यामुळे जगण्याला अर्थच नाही म्हणून निराष होणार्यांनी अपेक्षांना नवा अर्थ नक्कीच शोधावा.
पानगळतीनंतर जस झाड टवटवीत होत ,तस आयूष्यही जगता येईल हेच निसर्गाचही सांगण असाव. आयुष्य खूप सुंदर आहे.गरज आहे ती सुंदर दृष्टीकोनातून पहाण्याची.अपेक्षांचा चश्मा बाजूला सारुन तर पहावूया....नक्कीच दिसेल एक स्वच्छ आणी निर्मळ आयष्य....स्वच्छंदी आणी अपेक्षांच्या ओझ्यानी न दबलेल......!!!
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही..✍️✍️...
खूपच सुंदर लिहिलंय 👌👌👌👌💐💐💐💐
ReplyDelete