आपुलकीची झलक दिसता....
रमते बर ती वेडी...
परके पणाची भीती....
जाते कुठे तीची थोडी....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
झोपेतून उठता असतो ग हट्ट त्या वेड्याचा.....
झलक माझी पहाण्याचा.....
मला ही आवडतो बहाणा.....
माझ्यात असा त्याचा ग तो रहाण्याचा......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कदर नाही केली तर.....
जाईन अशी रूसून.....
झलन ही दिसणार नाही....
डोळे जातील तुझे तरसून....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
एक झलक पुरी नसते.....
माणुस तो ओळखण्यासाठी...
किती वर्षांची साथ ही कमी पडते...
कधी कधी समजून ते घेण्यासाठी.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कठीण असत ज्यांची....
झलक ही पहाण....
त्यांनाच जमत जीवनात....
खास होऊन राहण....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
स्वार्थामागे कशी ना....
माणूसकी ती दडली....
फायद्या तोट्यावर आता....
झलक तीची ठरली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तु नाही दिसलास की राजा....
मन वेड रे तडफडत....
तुझी झलक पहाता....
बघ ना कस हे धडधडत......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
किती निरागस पणे विचारल त्याने....
आवडत काय ग तुला....
मी ही हळूच म्हणून गेली....
तुझी एक झलक हवी रे रोज मला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
बालपण ही झलक दाखवून....
क्षणात तीच ते निघून जात....
ताई म्हणता ती माय होते....
जगण अस सहज तीलाच जमून जात....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही....✍️✍️..
No comments:
Post a Comment
Welcome to Shaheen plz. Comments