15 June 2022

गून्हा कुणावर नोंदवायचा??!!

        पहाटेच जाग आली ती रडण्याच्या आवाजानेच.हंबरडा फोडून तो रडण्याचा आक्रंद मन हेलावून जाणारा होता. उजाडे पर्यंत उगाच मनात  प्रश्न थैमान घालत होते....उजाडल्यावर ही दूःखद बातमी कळाली समाधान गेल्याची.मन सून्न झाल .हे  सगळ खोट असाव उगाच मनाला वाटल.कालच दुपारी तो शिकवणीला आलेल मग काय घडल असेल प्रश्नच हेलावुन गेला.
       समाधान 9 वर्षाचा निरागस आणी हुशार विद्यार्थि माझा.नादारीची परीस्थीती असताही त्याने शिक्षण घेऊन मोठे व्हावे हे त्याच्या आईच स्वप्न.बापाला कामाची ओढ कमी व्यसनांचीच जास्त.त्यातही ती रेटत होती संसार आणी दुनियादारीची कर्तव्यही....
        हिम्मतच नव्हती कस भेटाव त्या आईला,कुठले सांत्वनपर शब्द बोलावे कळतच नव्हते.पण ,समाधानाला शेवटच पहायच होत म्हणून खुप हिम्मत जोडून पोहचले.
       समाधान तर सूटला जीवनाच्या खेळातून.पण त्या आईची सल कशी मांडू......मला पहाताच ती कळवळलीच,"ताई पहाना समाधान गेला,...तो जातांना आई..!! आई ..!!आवज देत होता हो,आणी मी त्याला कुशीतही नाही घेऊ शकले.त्याच्या बापाने रात्रीही रोजसारखीच खुप पिलेली.समाधान ईकडे तापाने फणफणत होता.आणी त्याच्या बापाला हवी होती बायको,त्याचा हक्क की वासना.खुपदा सांगीतल त्यांना समाधानाला माझी गरज ,पण शांत होईस्तोवर त्याने सोडलच नाही.आणी आल्यावर पहाते समाधान निघुन गेलेला".......
          खरच निःशब्द मी....काय बोलाव...कुठल्या प्रेमावर जबरदस्तीचा गून्हा नोंदवावा...??!!स्त्री-पुरूष,की पती पत्नी की व्यसनी असण्यावर की समाजावर.....नक्की वीचार करुया आणी नक्कीच हे बदलायला हव...!!

(ही सत्य घटना ...आजच्या विषयाला बघता मांडायचा प्रयत्न केलेला....)

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                         शाही..✍️✍️

1 comment:

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...