जबाबदारिची जाणिवच.....
आहे ती बर.....
स्वप्नांशी तडजोड करायला.....
शिकवते जी खर.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
एक तडजोड वेडू....
चलना आपण अशी करू....
एकमेकांना बदलायचा....
प्रयत्न नाही हं कधी करू....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मी असता ही तडजोड राजा....
करावी लागली जर तुला....
प्रेमात मी हरल्याची ती.....
सल असेल आजन्म मला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तडजोड म्हणजे......
शरणागती नाही बर.....
परिस्थितीवर केलेली......
असते ती मात खर......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आयुष्य म्हणजे तडजोड......
हे कुलदिपकालाही लागू पडत बर.....
कर्तव्यात स्वप्न त्याचीही भंगतात.....
पण वाच्यता कमी होते कटुसत्य हे खर.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
छंद आवड निवड.....
जरी वेगळी असली.....
मन जुळली नारे आता.....
मग तडजोड ती कसली?!....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तत्वांशी तडजोड.....
नको करु बर....
आयुष्य म्हणजे तडजोड....
असुदे कितीही खर....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आयुष्य म्हणजे तडजोड.....
या शिवाय नात टिकत रे नसत.....
नात्याचा खरा सन्मान.....
समजून नी सांभाळून घेण्यात रे असत....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आयुष्य म्हणजे तडजोड जणू.....
दुनियादारीतला वकील छान .....
कुठलाही वाद संपवतो....
ठेऊन त्या वेळेच भान....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही....✍️✍️
No comments:
Post a Comment
Welcome to Shaheen plz. Comments