27 June 2022

चारोळी संग्रह....

नको होऊ उन्मन्त बर.....
गगन भरारी घेता.....
यश हा पाठशिवणीचा खेळ....
जप बर मनाची स्थिरता....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वप्नांचे पंख लावून....
प्रयत्नाना दे भरारी....
यश तुझेच असेल.....
फीरु नको रे माघारी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सांग ना सख्या होशील का....
बळ रे या पंखांच.....
घ्यायचीय रे भरारी.....
स्वप्न आभाळी रे ऊडण्याच.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

घे भरारी  पण.....
लक्षात हे ही रेअसू द्यावे....
ध्येय नी स्वप्नांच्या पाठी....
नाते कुठलेच रुसू न द्यावे...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

घे भरारी कीतीही.......
पण स्त्य हे जीवनाचे......
आभाळात नाही ठीकाण.....
कुठेच बर रहाण्याचे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

घे उंच भरारी
जसा उडे आकाशी शिकरा
दाखवून दे आता
तूझ्या अस्तित्वाचा अर्थ खरा

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चाखायची असेल यशाची गोडी....
एक तु करशील का......
तोडून  स्त्रीत्वाची बेडी.....
उंच भरारी तु भरशील का.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

घे भरारी.....
वैचारीक बर.....
प्रगतीच कारण....
हेच खर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कल्पनेच्या जगात.....
घेते ग भरारी......
आवडत मला.....
रमायला तीथे भारी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

  घे बर भरारी......
हव त्य क्षेत्रात.......
ऐकल हे खुपदा.......
गप्पांच्या ओघात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


No comments:

Post a Comment

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...