25 June 2022

चारोळी.संग्रह...

प्रेमाची रीत गं तो.....
जाता जाता ही निभवून गेला.....
फुलासोबत काटाही ....
असा तो ठेऊन गेला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सगळ्या फुलांच्या भाळी नसते....
जपणार्या काट्यांची साथ बर....
निसर्गाने  किती सहज....
मांडल जीवनाच गुपीत  खर...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

येतात बर कधी कधी.....
काटेच जीवनात.....
पूढच वळण असत फुलांच....
नेहमी ठेवाव ध्यानात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सुगंधीत  फुल नी.....
बोचणारे  ते काटे....
सुख दूःखाच्या क्षणांना....
जणू फुटलेले फाटे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

राणातला निवडूंगही.....
खुप ग शिकवतो......
काटेरी खडतर जीवनात ही......
मोहक आशेचा फुलोरा फुलवतो.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

फुले यावीत  पायदळी तूझ्या.....
काटे मी जपत जाईन......
सावली होऊन तुझी वेड्या.....
नेहमी  मी संगती राहीन....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

फुल आणी काटे.....
जणू सुख दूःखाची जोडी....
अपरीहार्य सोबत रहाण.....
यातच जीवनाची गोडी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काट्यावर हसणार.....
फुल ते पाहील होत.....
दुःखातही हसत रहा.....
जणू सांगून ते राहील होत....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

फुल आणी काटे.....
असावे संगत.....
जपणार्यांची सोबत....
आणते जीवनात रंगत.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                               शाही....✍️✍️


No comments:

Post a Comment

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...