26 June 2022

परी....चारोळी संग्रह

प्रत्येक कवयत्री आहे ना  परी.....   
शब्दांनी जादू तीच्या  घडते.....
शब्दपंख लावून कशी ती वेडी....
कल्पनेच्या नभात ना उडते...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेडू देशील का ग हक्क.....
अश्रृ तुझे पुसण्याचे.....
तू हसता दिसते ग परी....
देना हक्क हसू ते जपण्याचे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हवी गं म्हणे परी.....
तूझ्यासारखीच एक गोड.....
पण नको बर  तीला....
तूझी बडबड करण्याची  खोड....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

असतेना लेक जरी.....
आई बाबांची परी.....
पण आई बाबाच असतात....
तीची जादूची कांडी खरी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अपूर्ण ते स्वप्न......
पण रोजच तो बघत असतो.....
गोड परीसोबत त्याच्या.....
स्वप्नात तो खेळत असतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खुपदा ती वेडी.....
त्याची स्वप्नपरीच ठरते....
कधी अव्यक्त तर कधी....
दुनियादारीत  ती हरते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सखी तुही जणु ......
आहे एक परी बर.....
सगळ्यांच्या अस्तित्वाला....
दिली गं ओळख नवी तुच खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लेखणीही आहे गं....
जणू एक परी....
अव्यक्त रहात नाही....
वेदना ती  अंतरी ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ताई माझी सखी....
परी माझी खास....
देते मला ती....
नेहमी आईचा गं आभास....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                        शाही.....✍️✍️


1 comment:

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...