चुकलेल्या निर्णयांचे.....
परीणाम ते रे जाणतात......
विचार करून निर्णय घ्यावे.....
उगाच का वडीलधारे म्हणतात.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
किती अशा प्रश्नांना......
सामोर ना जाव लागत......
चुक की बरोबर ठरवण्यासाठी.....
निर्णय आधी घ्यावा लागतो.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
घेतलेला निर्णय कधीच.....
चुकीचा नसतो रे बर.......
फक्त तो बरोबर आहे.....
हे सीध्द करण्याची जीद्द हवी रे खर....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शंकेची पालच ती......
घात करून गेली......
निर्णय चुकीचा ठरणार म्हणत......
ती निर्णय घ्यायचच राहुन गेली.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
निर्णय चुक की बरोबर......
नको हा विचार आधी......
अनुभव भेटेल की आत्मविश्वास.....
हे निर्णय घेतल्यावर कळतरे कधी......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अहंकाराशी मैत्री.....
चुकीचा निर्णय ठरते बर.....
हा निर्णय चुकीचा......
संगतीत याच्या हे कळत नाही खर.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
सुंदर विचारांऐवजी.....
सुंदर चेहरा आवडून गेला......
हा चुकीचा निर्णय.....
आयुष्यभर मग रडवून गेला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
रागात घेतलेला निर्णय....
चुकतो रे बर.....
पश्चाताप होऊन....
सलतो मग खर ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
निर्णय घेतांना.....
चुक नको रे व्हायला....
आजन्म राहील....
सल ती सलायला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
निर्णय निर्णय असतात बर....
चुक की बरोबर....
हे वेळ आणी अनुभव....
ठरवते ना खर....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही....✍️✍️
No comments:
Post a Comment
Welcome to Shaheen plz. Comments