क्षणभराच्या सुखाची....
वाटते गं भिती.....
उगाच त्याच्या ओढीत....
दूःख गाठले किती....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
क्षणभराच्या सुखामागे....
इतका गं तो धावला....
स्वःलाही नाही मग.....
कधी तो गावला.....
गावला-भेटला
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
क्षणभराच्या सुखासाठी.....
बळी प्राण्यांची देतो.....
कसा रे माणसा तू......
इतका रे स्वार्थी होतो.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
क्षणभराच्या सुखाचा.....
मोह नाही रे बरा.....
पाठशिवणीचा खेळ हा....
ऊन सावल्यांचा सारा....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
क्षणभर भेटत सुख......
वेडू तुला गं आठवून........
देतजा गं अशा कधी.......
आठवणी तूझ्या बर पाठवून......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
क्षणभराच्या सुखामागे.....
किती रे पळशील......
आई बाबांना वेळ दे.....
खरे सुख कळतील.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
क्षणीक सुख ते.....
जणू दव पानावर.....
अलगद निसटून जात.....
मन येत मग भानावर....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
क्षणिक सुखासाठी नको मांडू....
प्रेमाचा रे खेळ बर.....
तूझ्या ह्या खेळापायी....
उध्वस्त होतात आयुष्य खर.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
एश्वर्य आणी सुख.....
क्षणीक इथले.....
आनंदाचे रंग म्हणता.....
उगाच जीव रे त्यात गुंतले...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
क्षणभराच सुख जणू.......
फुलपाखरु खोडकर......
निरपेक्ष असता भावना....
अलगद येऊन बसत मनपटलावर.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही....✍️✍️
No comments:
Post a Comment
Welcome to Shaheen plz. Comments